actress Sharvari Jog new serial kunya rajachi ga tu rani as lead cast gunja on star pravah sakal
मनोरंजन

Sharvari Jog: अभिनेत्री शर्वरी जोगला मिळाली मोठी मालिका, पहिल्यांदाच येतेय प्रमुख भूमिकेत..

'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेत साकारणार गुंजा..

नीलेश अडसूळ

Sharvari Jog: 'जीव झाला येडापीसा', 'जाऊ नको दूर बाबा' अशा मालिकांमधून मध्यवर्ती आणि महत्वाच्या भूमिकेतून समोर आलेला एक गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री शर्वरी जोग. आजवर तिने एकांकिका, नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून भूमिका साकरल्या आहेत.

पण प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं की तिची प्रमुख भूमिका असलेली मालिका तिला मिळावी. आणि अखेर हीच शर्वरीची इच्छा पूर्ण झाली आहे. शर्वरी लवकरच एका नव्या मालिकेतून प्रमुख नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.

'कुन्या राजाची गं तू रानी' असे या मालिकेचे नाव असून. या मालिकेत 'गुंजा' असे तिच्या पात्राचे नाव आहे. मातीतल्या माणसांचे जगणे सांगणारे ही मालिका असेल.

(actress Sharvari Jog new serial kunya rajachi ga tu rani as lead cast gunja on star pravah)

 स्टार प्रवाहवर १८ जुलैपासून 'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका सुरू होतेय. डोंगरवाडी सारख्या छोट्याश्या खेडेगावात रहाणाऱ्या मात्र मोठी स्वप्न पहाणाऱ्या गुंजाची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. 

गुंजा म्हणजे एक रानफळ. गुंजाचं झाड औषधी असतं, त्याचा पाला आपण गोड पानात खातो. गुंज्याची सगळी फळं वजनाला परफेक्ट एका भाराची असतात, म्हणून सोनं तोलत असताना ग्रामीण भागात आजही दोन गुंज, पाच गुंज सोनं असं म्हंटलं जातं.

रानातल्या या मौल्यवान फळावरुनच गुंजाला गुंजा हे नाव पडलं. अभिनेत्री शर्वरी जोग या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मुळची कोल्हापूरची असणाऱ्या शर्वरीने वयाच्या ५ वर्षांपासूनच कथाकथन, बालनाट्यांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक एकांकिकांमध्ये तिने आपली छाप सोडली. अभिनयाच्या याच वेडापायी शर्वरीने मुंबई गाठली आणि तिचा मालिका विश्वात प्रवेश झाला.

गुंजा ही शर्वरीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा आहे. शर्वरीप्रमाणेच गुंजाचं ही स्वप्न आहे खूप शिकून आपल्या आईला शहरात घेऊन जायचं. याच स्वप्नांचा पाठलाग करत गुंजा आपलं ध्येय साधणार आहे.

गुंजा या भूमिकेबद्दल सांगताना शर्वरी जोग म्हणाली, ‘स्टार प्रवाहने दिलेली ही संधी माझ्या आयुष्याला नवी कलाटणी देणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारणार आहे. गुंजाबद्दल सांगायचं तर अतिशय खेळकर, निखळ आणि आत्मविश्वासू असं हे पात्र आहे.'

'तिला शिकून खूप मोठं व्हायचं आहे. गुंजा डोंगरवाडीची भाषा बोलते. तिचे तिचे असे काही खास शब्द आहेत. मी मुळची कोल्हापूरची असल्याने गुंजाची भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. गुंजाचा लूकही वेगळा आहे. गुंजामुळे माझी पाण्याची आणि उंचीची भीती दूर पळाली.'

'मी पाण्यातही शूट केलं आहे आणि ६० फूट उंच टाकीवरही. सायकल चालवायलाही नव्याने शिकले. त्यामुळे गुंजा या पात्राने मला खऱ्या अर्थाने समृद्ध केलंय असंच म्हणायला हवं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT