मनोरंजन

सोनाली कुलकर्णीच्या 'तमाशा Live'च्या पोस्टरने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सुमारे ३० गाणी

प्रियांका कुलकर्णी

इतक्या महिन्यांच्या ब्रेकनंतर आता अनेक मराठी चित्रपटांच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. त्यातच आता आणखी एका बिग बॅनर चित्रपटाची भर पडली आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) हिची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून पटकथा संजय जाधव (sanjay jadhav) यांची आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग 'तमाशा लाईव्ह'चे निर्माता आहेत.

'तमाशा लाईव्ह' विषयी दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, '' हा एक संगीतमय चित्रपट असून यात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. तर कोरिओग्राफी उमेश जाधव यांची आहे. एकंदरच चित्रपटाची टीम एकदम भन्नाट आहे. मुळात सोनाली माझी खूप चांगली मैत्रीण आहे. परंतु आम्ही प्रथमच एकत्र काम करत आहोत. त्यामुळे या प्रोजेक्टबाबत मी खूपच उत्सुक आहे.''

'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''संजय जाधव आणि सोनाली कुलकर्णी हे दोघेही आपापल्या विभागात एकदम अव्वल आहेत. संजय जाधव सोबत मी 'अनुराधा' करत आहे तर सोनाली सोबत मी 'हाकामारी' करत आहे आणि आता 'तमाशा लाईव्ह'च्या निमित्ताने या दोघांसोबत एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. संगीतमय चित्रपट आम्हीसुद्धा पहिल्यांदाच करत आहोत, त्यामुळे आमची पण उत्सुकता तेवढीच आहे. विषय वेगळा असल्याने प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.'' पोस्टरवरून हा चित्रपट संगीतावर आधारित असल्याचे कळतेय. मात्र या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, यासाठी दिवाळी २०२२ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

Amit Shah: “तुमच्या चार पिढ्या आल्या तरी पुन्हा कलम 370 आणू शकणार नाहीत”; अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं

Latest Maharashtra News Updates : धुळे जिल्ह्यात सव्वा दोन एकरात गांजाची शेती; सुमारे ६ कोटींचं पीक उध्वस्त

KL Rahul - आथिया शेट्टी होणार आई-बाबा! सोशल मीडियावरून केली घोषणा

TET Exam : आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक हजेरी होणार

SCROLL FOR NEXT