Bollywood filmmaker goldie Behl talks about boycott trend  Instagram
मनोरंजन

'बॉयकॉट ट्रेन्डमुळे बॉलीवूड सिनेमे फ्लॉप?', निर्माता गोल्डी बहलचं उत्तर एक नंबर

सध्या बॉलीवूडमध्ये एकामागोमाग सिनेमे फ्लॉप होत आहेत आणि याचं संपूर्ण खापर बॉयकॉट ट्रेन्डवर फोडलं जात आहे.

प्रणाली मोरे

Boycott Bollywood : २०२२ साल अजूनतरी बॉलीवूडसाठी (bollywood) फार काही चांगलं ठरलेलं दिसत नाही. जेवढे सिनेमे आतापर्यंत रिलीज झाले आहेत, त्या सगळ्यांना लोकांनी बॉयकॉट केलं आहे. आणि याचा परिणाम रिकामे थिएटर्स आणि बॉक्सऑफिसची ढासळलेली कमाई हे दिसून आलंच आहे. आणि त्यामुळेच तर निर्मात्यांनी सिनेमा थिएटरमध्ये रिलिज झाले नं झाले तोच त्यांना ओटीटीवर रिलीज करण्याचा सपाटा लावला आहे. अशीच परिस्थिती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या 'लायगर' ची देखील झाली. त्याच्या सिनेमानं देखील फार काही कमाल दाखवली नाही आणि सपशेल तोंडावर आपटला. आता यासगळ्या मागे बॉयकॉट(Boycott) हे मुख्य कारण असल्याचं रडगाणं गायलं जात आहे. पण निर्माता-दिग्दर्शक गोल्डी बहलचं(Goldie Behl) मात्र म्हणणं काही वेगळंच आहे. त्यानं एका मुलाखतीत या परिस्थितीवर मोकळेपणानं भाष्य केलं आहे.(Bollywood filmmaker goldie Behl talks about boycott trend)

गोल्डी बहलला(Goldie Behl) त्या मुलाखतीत जेव्हा विचारलं की,''लाइगर बॉयकॉट ट्रेन्डमुळे फ्लॉप झाला का? त्यावर अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा पती निर्माता गोल्डी बहल म्हणाला,''नाही,मला नाही वाटत की बॉयकॉट ट्रेन्डमुळे सिनेमे बॉक्सऑफिसवर असफल ठरत आहेत. मला वाटतं की जर तुम्ही थिएटरमध्ये सिनेमे पहायला जाणाऱ्या आणि सोशल मीडियावर सिनेमे बॉयकॉट करणाऱ्यांचा आकडा पाहिलात तर तुम्हालाच सगळं चित्र स्पष्ट दिसेल''.

गोल्डी बहलनं बॉलीवूडला बॉयकॉट करण्याच्या ट्रेन्डविषयी बोलताना म्हटलं आहे की, ''ही खूपच दुर्भाग्याची गोष्ट आहे. मला वाटतं की कोणताही ट्रेन्ड चांगल्या सिनेमाला यशस्वी होण्यापासून थांबवू शकत नाही. आणि मी या मतावर ठाम आहे. मी या इंडस्ट्रीत खूप वर्षांपासून काम करत आहे. जर सिनेमाशी लोक स्वतःला कनेक्ट करु शकले तर त्या सिनेमाला बॉक्सऑफिसवर कमाई करण्यापासून थांबवण्याची हिम्मत कशातच नाही. पण सध्या लोक सगळीकडे नकारात्मकता पसरवत आहेत ही चांगली गोष्ट घडताना दिसत नाही. मला नाही वाटत या नकारात्नकतेचा सिनेमावर परिणाम होऊन ते बॉक्सऑफिसवर चालत नाहीत किंवा हा एक योगायोग असावा की बॉयकॉट ट्रेन्ड सुरु आहे आणि सिनेमे फ्लॉप होत आहेत. पण निश्चितच बॉयकॉट ट्रेन्डमुळे सिनेमे फ्लॉप होतायत यावर माझा विश्वास नाही. कारण चांगल्या कलाकृतीला कोणीच लोकांशी कनेक्ट होण्यापासून थांबवू शकत नाही''.

लाइगर सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज झाला होता. या सिनेमानं एका आठवड्यात ३९ करोड कमावले होते. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या सिनेमात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांड्ये मुख्य भूमिकेत दिसले होते. बॉक्सऑफिसवर सिनेमा अयशस्वी ठरल्यानंतर अभिनेता आणि दिग्दर्शकानं आपल्या खिशातून नुकसानभरपाई केली होती. इतकंच नाही तर त्यांनी आगामी 'जन गण मन' सिनेमाचं कामही थांबवलं होतं. या सिनेमाला देखील पुरी जगन्नाथच दिग्दर्शित करत होता. पण 'लाइगर' फ्लॉप झाल्या कारणाने पुरी जगन्नाथने सध्या 'जन गण मन' सिनेमावरच्या कामाला स्थगिती आणल्याचं कळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT