Actress swara bhasker File
मनोरंजन

स्वराच्या फॅमिली whats app ग्रुपमधील आई-वडिलांचे चॅट व्हायरल; म्हणाली...

या चॅटचा स्क्रीनशॉट स्वराने ट्विटरवर शेअर केला आहे

सकाऴ वृत्तसेवा

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमी चर्चेत असते. बोल्ड वक्तव्य आणि दिलखुलास व्यक्तिमत्वामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकताच स्वराच्या फॅमिली व्हाट्सअप ग्रुपमधील चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या चॅटचा स्क्रीनशॉट स्वराने ट्विटरवर शेअर केला आहे. तिच्या वडिलांचा आणि आईचा व्हाईज मेसेज या चॅटमध्ये दिसत आहे.

या व्हाईज मेसेजमध्ये स्वराचे आई वडिल फ्लर्टिंग करत आहेत असे स्वराने ट्विटला दिलेल्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. या ट्विटला स्वराने कॅप्शन दिले, ‘काळ अंधाराने भरलेला आहे पण आपल्या पालकांसोबत चॅटवर नेहमी मस्ती असते’. या चॅटमध्ये स्वराने तिच्या आई वडिलांना मेसेज केला आहे की, ‘प्लिज एकमेकांच्या चॅट बॉक्समध्ये फ्लर्ट करा’.

स्वराच्या या फॅमिली ग्रुपच्या नावाने तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 'टू इन वन' असे या ग्रुपचे नाव आहे. एका नेटकऱ्याने ‘अमेजिंग’अशी कमेंट केली आहे.

स्वराने 'रांझणा', 'तनु वेड्स मनु', 'निल बटे सन्नाटा' आणि 'वीरे दी वेडिंग' या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती आता एका ओटीटी प्लेटफॉर्मवरील एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. या आधी तिने 'रसभरी’या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. तसेच 'आपके कमरे में कोई रहता है' या प्रसिध्द वेब सिरीजमध्ये तिने काम केले. नेटफ्लिक्सवरील 'भाग बीनी भाग' या वेब सिरीजमधील स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

IPL 2025 Mega Auction: लिलाव संपला! १८२ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी खर्च केले ६३९.१५ कोटी रुपये; पाहा खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT