Actress Tunisha Sharma death update, Suicide case Google
मनोरंजन

Tunisha Sharma Death: तुनिषाला दहा दिवसांपूर्वीच आला होता एंजायटी अटॅक..हतबल होत आईला म्हणाली होती...

20 वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येच्या केस प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत.

प्रणाली मोरे

Tunisha Sharma Death: शनिवारी २४ डिसेंबर,२०२२ रोजी २० वर्षीय तुनिषा शर्मा टी.व्ही मालिकेच्या सेटवर शूटिंग करत होती. वॉशरुमला जाते म्हणून सांगून गेली ती वळली मेकरुम कडे,जिथे त्यावेळी कुणी नव्हतं. मेकअप रुममध्ये पोहोचल्यावर तिनं दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर तुनिषाचे मित्र आणि सहकलाकार शीजान दरवाजा तोडून आत पोहोचले आणि तुनिशाच्या बॉडीला फासावरनं खाली उतरवलं. तुनिशा शर्मा निधनाच्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. तुनिशाच्या काकांनी शीजानचं नाव न घेता आरोप केले आहेत.(Actress Tunisha Sharma death update, Suicide case)

तुनिशाच्या काकांनी १० दिवसआधी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलं की-''अलीबाबा शो सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच तुनिशा आणि शीजान एकमेकांच्या अधिक जवळ आले होते. जवळपास १० दिवस आधी तुनिशाला एंजायटी अटॅक देखील आला होता. यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं. तिचे काका पुढे म्हणाले की जेव्हा मी आणि तिची आई तिला भेटायला गेलो तेव्हा तुनिशानं सांगितलं की तिच्यासोबत खूप चुकीचं घडलं आहे. तिचा विश्वासघात झाला आहे''.

''आम्हाला अंदाज तेव्हा आला होता की काहीतरी गडबड आहे. तेव्हा तिच्या आईनं विचारलं की जेव्हा नातं नव्हतं निभवायचं तर मग एवढी जवळकी साधलीच कशाला? आम्हाला वाटतं की या प्रकरणात ज्याचा दोष आहे,त्याला शिक्षा झालीच पाहिजे. काकांनी सांगितलं की तुनिशाची मावशी इंग्लंडमध्ये राहते. ती भारतात आल्यानंतर २७ डिसेंबरला तुनिशावर अंत्यसंस्कार केले जातील''.

माहितीसाठी इथे सांगतो की तुनिशा शर्माच्या आईनं अभिनेत्रीचा खास मित्र शीजान खानवर मोठा आरोप लावला होता. आईचं म्हणणं आहे की शीजानमुळे त्यांच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. या घटनेसाठी शीजानच जबाबदार आहे. तर,तुनिशा केस मध्ये ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश शायमलाल गुप्ता यांनी सरकारकडे SIT टीम नेमण्यासाठी मागणी केली आहे.

तर AiCWA च्या अध्यक्षांनी सांगितले आहे की- ''मी त्या सेटवर गेलो होतो,जिथे तुनिशा शर्माने आत्महत्या केली. तिथे लोक घाबरले आहेत आणि काही ना काही तरी गडबड नक्कीच आहे. सरकारनं या प्रकरणावर लक्ष द्यावं आणि SIT नेमून तपास सुरु करावा. खूप गोष्टी बाहेर येतील. सेटवर महिला सुरक्षित नाहीत. सेट खूप आतमध्ये आहे. तिथे लोकांना यायला-जायला भीती वाटते''.

तुनिशा शर्मा टी.व्ही शो 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' मध्ये दिसली होती. तिनं 'फितुर' आणि 'बार बार देखो' सारख्या सिनेमात तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली आहे. विद्या बालन च्या 'कहानी २' मध्ये देखील काम केलं होतं. तुनिशा 'इंटरनेटवाला लव्ह',' इश्क सुभानल्लाह','गायब', 'शेर-ए-पंजाब महाराजा रणजीत सिंग' सारख्या अनेक शोज मध्ये दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT