Vaibhavi Upadhyaya last post - टीव्ही मनोरंजन विश्वाला गेल्या काही दिवसांपासून मोठे धक्के बसताना दिसत आहे. मागील चार दिवसांत सहा सेलिब्रेटींचा मृत्यू झाल्यानं चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्यामुळे बॉलीवुडमध्ये अत्यंत चिंतेचं वातावरण आहे.
साराभाई वर्सेस साराभाई मध्ये जॅस्मिनची भूमिका करणाऱ्या वैभवी उपाध्यायचे मंगळवारी सकाळी निधन झाले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला आहे. अवघ्या ३२ व्या वर्षी वैभवीनं जगाचा निरोप घेतल्यानं तिच्या चाहत्यांमध्ये मोठा शोक पसरला आहे.
सकाळपासून मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात असतानाच वैभवी शेवटची पोस्ट आता चर्चेचा विषय ठरत आहे. सोळा दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेश मधूनच तिने शेवटचा एक व्हिडिओ शेयर केला होता.
(actress Vaibhavi Upadhyaya last instagram post viral on social media after she dies in an accident)
हा व्हिडिओ मध्ये वैभवीनं हिमाचल प्रदेशातील काही दृश्ये शेयर केली आहेत. ह्यामध्ये निसर्गरम्य हिमाचल प्रदेश, पर्वत, धबधबे, मंदिरे दिसत आहेत. शिवाय काही स्तूप, प्राचीन वास्तु यांचीही माहिती तिनं दिली आहे.
या व्हिडिओ सोबतच तिने हिमाचल प्रदेशचे वर्णन करणारे कॅप्सन दिले आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ 4 वर्ष जुना आहे, आणि याच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ती पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती.
वैभवी (tv actress) ने या व्हिडिओमध्ये एक कॅप्शन दिले आहे. ज्यावर असे लिहिले आहे की, 'सगळं काही बाजूला ठेवून थोडं थांबा आणि मोकळा श्वास घ्या.. कारण आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण जगून घ्यायला हवा..'
हे कॅप्शन वाचून अनेकांना धक्काच बसला आहे. तीची ही पोस्ट १६ दिवसांपूर्वीची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आता वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
याच हिमाचल प्रदेशच्या प्रवासादरम्यान तिच्या कारचा अपघात झाला आणि वैभवीचे निधन झाले. आज बुधवारी मुंबईत अभिनेत्रीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. वैभवीच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.