The Kerala Story Esakal
मनोरंजन

The Kerala Story: 'अरे मुलीचे नंबर नंतर डिस्कस करा आधी..', 'द केरला स्टोरी' च्या वादावर अदा शर्मानं दिलं सणसणित उत्तर....

Vaishali Patil

सध्या मनोरजंन विश्वात अदा शर्मा स्टारर 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 'द केरला स्टोरी'च्या ट्रेलरने इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकिय विश्वातही बरिच चर्चा सुरु झाली.

हा चित्रपट, 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या. ऐकीकडे प्रेक्षक 'द केरला स्टोरी' या चित्रपटला चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

तर काहीजण याला वादग्रस्त आणि अपप्रचार म्हणत आहेत. यातुन चुकिचा प्रोपगंडा पसरवण्याच काम करण्यात येत आहे. असंही म्हटलं जात आहे. आता या सर्व प्रकरणावर अभिनेत्री अदा शर्मानं तिची प्रतिक्रिया दिली आहे.

द केरळ स्टोरीबद्दल अदा शर्माने एक व्हिडिओही शेअर केला. ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ती म्हणतेय, "आमचा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण तो दहशतवादविरोधी संघटनेवर नक्कीच भाष्य करत आहे."

"आमचा चित्रपट मुलींवर अत्याचार, अंमली पदार्थ सेवन, ब्रेनवॉश, बलात्कार, मानवी तस्करी आणि लोकांकडून वारंवार बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भधारणा ते ज्या मुलाला जन्म देतात ते त्यांच्यापासून काढून घेतले जाते आणि नंतर त्यांना आत्मघाती बॉम्बर बनवले जाते.' अशा अनेक गंभीर समस्यांवर भाष्य करत आहे. "

याशिवाय अदाने मिडियासोबत देखील चर्चा केली. ती म्हणाली की, ' एक भारतीय असल्या नात्याने, एक माणूस विषेशता: एक मुलगी असणं यानात्याने ही खूप भीतीदायक आणि धक्कादायक गोष्ट आहे की मुली गायब होत आहेत. "

"याहून भीतिदायक गोष्ट म्हणजे जो कोणी याला अपप्रचार म्हणत असेल किंवा गायब झालेल्या मुलींच्या संख्येच्या आकडेवारीला डिस्कस करत असेल, तर मला विश्वास बसत नाही कीआधी आपण नंबर जस्टिफिकेशन देत आहोत आणि नंतर मुली गायब झाल्या आहेत असं म्हणत आहोत. आपण उलट करायला हवे. आधी मुली गायब झाल्या आहेत हे डिस्कस करा अन् नंतर नंबर डिस्कस."

विपुल अमृतलाल शाह यांचा चित्रपट 'द केरळ स्टोरी' प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज आहेत. ही कहानी केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांमागील सत्य घटनेवर आधारित असून, 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर प्रभावी आणि सत्य कथेवर आधारित असल्याचे दर्शवतो.

विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट एका दहशतवादी संघटनेने केलेल्या महिलांच्या तस्करीची हृदयद्रावक आणि धक्कादायक कथा समोर आणतो. ज्यात अदा शर्मा मुख्य भुमिकेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT