adinath kothare, konkan dashavtar, adinath kothare in dashavtar SAKAL
मनोरंजन

Adinath Kothare: कोकणातील सावंतवाडीत आदिनाथ कोठारेने केलं दशावतारात काम, व्हिडीओ व्हायरल

Devendra Jadhav

Adinath Kothare News: आदिनाथ कोठारे हा मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता. २०२२ ला चंद्रमुखी सिनेमातून आदिनाथने दौलतची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आदिनाथ कोठारे एका वेगळ्याच व्हिडिओमुळे चर्चेत आलाय. आणि आदिनाथचं कौतुकही होतंय. कोणी विचार केला नसेल अशी गोष्ट आदिनाथने करून दाखवली आहे.

कोकणात दशावतार हा लोककलाप्रकार फार लोकप्रिय आहे हे सर्वाना माहीतच आहे. आदिनाथने याच दशावतारात काम करून सर्वाना एक सुखद धक्का दिलाय. सावंतवाडीतील प्रसिद्ध उपरलकर देवस्थान येथे दशावतार नाटकात राक्षसाच्या भुमीकेत आदिनाथ कोठारे दिसला. आदिनाथला अशा अवतारात बघून उपस्थित ग्रामस्थांना आनंद झाला आणि त्यांचं मनोरंजन झालं.

"महेश कोठारे वडिल आहेत हे आदीनाथच भाग्य म्हणुन असे संस्कार रंगभुमिची सेवा करायचे.." , "खुप छान आदिनाथ कोठारे जी. अभिनंदन मालवणी संस्कृतीचा एक भाग म्हणून काम करताना बघून आनंद आहे.", "आदिनाथ कोठारे यांसारख्या कलाकारांनी दशावतार नाटकात भाग घेऊन तो अजून इतर भागात प्रचलित होईल असे पाहावे....छान.." अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी आदिनाथचं कौतुक केलंय.

आदिनाथ कोठारे हा मराठी इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. मागील काही महिन्यांपासून आदिनाथ आणि उर्मिला यांचं नातं बिनसलं आहे अशा चर्चा सुरू होत्या. अनेक तर्क - वितर्क लावले जात होते. मराठी चित्रपट विश्वामध्ये आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणारी जोडी म्हणून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेचे नाव घेतले जाते. परंतु महेश कोठारे यांच्या पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमाला आदीनाथ आणि उर्मिला एकत्र आले आणि या चर्चांवर अखेर पडदा पडला

आदिनाथने ८३ या सिनेमात दिलीप वेंगसरकरांची भूमिका साकारली तर चंद्रमुखी सिनेमात दौलत या राजकीय व्यक्तीची भूमिका साकारली. आदिनाथच्या दोन्ही भूमिका अत्यंत वेगळ्या होत्या. पण या दोन्ही भूमिकांचं कौतुक झालं. याशिवाय आदिनाथने दिग्दर्शित केलेल्या पाणी या पहिल्याच सिनेमासाठी आदिनाथला बेस्ट डिरेक्टर म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT