adipurush 2nd day box office collection prabahs, kriti sanon saif ali khan om raut  SAKAL
मनोरंजन

Adipurush Box Office: प्रेक्षकांची नाराजी.. आकडा घसरला, दुसऱ्या दिवशी झाली फक्त इतकी कमाई

Devendra Jadhav

Adipurush 2nd Day Box Office Collection News: आदिपुरुष सिनेमा रिलीज होऊन २ दिवस झाले आहेत. सिनेमावर सडकून टीका झालीय. सिनेमातल्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या.

सडकून टीका होत असली तरीही सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. पहिल्या दिवशी सिनेमाने १४० कोटींपर्यंत गल्ला जमवला. आता दुसऱ्या दिवशी सिनेमाने किती गल्ला जमवला आहे त्याकडे नजर मारू.

(adipurush 2nd day box office collection prabahs, kriti sanon saif ali khan om raut)

आदिपुरुषच्या सिनेमाची दुसऱ्या दिवसाची आकडेवारीही समोर आली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत कमाईत थोडीशी घट झाली आहे.

मात्र आदिपुरुषची कमाई मंदावल्यानंतरही सिनेमाने 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'आदिपुरुष'ने दुसऱ्या दिवशीही धमाकेदार कमाई केली आहे. पण ओपनिंगच्या दिवसाच्या तुलनीत कमाई कमी झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 65 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाची दोन दिवसांची कमाई 151.75 कोटींवर पोहोचली आहे.

अवघ्या दोन दिवसांत 150 कोटींहून अधिक कलेक्शन ही एक चांगलीच गोष्ट म्हणता येईल. त्याचबरोबर रविवारच्या सुट्टीतही हा सिनेमा भरघोस कमाई करणार असल्याचे मानले जात आहे.

आदिपुरुष विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका

आदिपुरुष सिनेमा रिलीज होऊन एक दिवस झाले नाहीच तोच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

आदिपुरुष’ चित्रपटातील राम, सीता, रावण आणि हनुमान या पात्रांचा समावेश असलेली कथित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची किंवा दुरुस्त करण्याचे निर्देश मागणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या गटाने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला. जनहित याचिका (PIL) म्हणून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत दावा करण्यात आला आहे की

चित्रपटातील पात्रे 'रामायण' या महाकाव्यातील या धार्मिक व्यक्तींच्या चित्रणापासून विचलित आहेत. एकुणच प्रचंड विरोध होऊनही आदिपुरुष कमाईचे रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash in Pune: बापरे! ते हेलिकॉप्टर मुंबईत सुनिल तटकरेंना घ्यायला जात होतं, त्यापूर्वीच मोठी दुर्घटना

Helicopter Crash In Pune : पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले! तीन जणांचा मृत्यू

Nashik Traffic Route Change : मुंबई नाका, भगूर येथे यात्रोत्सव; नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल

Samsung Strike: सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरुच; पोलिसांनी 900हून अधिक कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

Star Pravah : आता उलगडणार कथा साडेतीन शक्तीपीठांची ; देवी रेणुका अवतरणार लेकरांसाठी

SCROLL FOR NEXT