Adipurush: प्रभास आणि सैफ अभिनित आदिपुरुष सिनेमावरनं सुरु झालेलं वादाचं वादळ काही थांबायचं नाव घेईना. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीच नाही तर मनोरंजन सृष्टीतूनही आदिपुरुष मधील रावणाच्या लूक विरोधात आवाज उठवला जात आहे. आता मग राजकीय वर्तुळात या वादावरनं खळबळ माजली तर नवलच. आता तिथेही राजकीय नेत्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशच्या मंत्रीमहोदयांनंतर आता महाराष्ट्रातूनही नेत्यांनी आदिपुरुषला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत घाटकोपरमधील भाजप नेता राम कदम यांनी आदिपुरुषच्या मेकर्सना थेट धमकी देत म्हटलं आहे की,''महाराष्ट्रात आम्ही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही''. राम कदम यांनी एकापाठोपाठ एक असे दोन ट्वीट करत महाराष्ट्रात सिनेमा रिलीज होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राम कदम यांनी गुरुवारी ६ ऑक्टोबर रोजी दोन ट्वीट केले ज्यात त्यांनी म्हटलंय की, टटआदिपुरुषच्या मेकर्सच्या वाईट विचारप्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी सिनेमावर बंदी आणायला हवी''. अर्थात,हे पहिल्यांदाच घडत नाही आहे. सुरुवातीला देखील आदिपुरुषचं पोस्टर रीलिज झालं होतं तेव्हा राम कदम यांनी सिनेमाला तीव्र विरोध जाहीर केला होता.
भाजप नेता-प्रवक्ता राम कदम यांनी आज ६ ऑक्टोबर,२०२२ रोजी सकाळी दोन ट्वीट करत त्यात लिहिलं आहे की,''आदिपुरुष सिनेमाला महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. आदिपुरुष सिनेमाच्या माध्यमातून मेकर्सनी चुकीच्या मार्गाचा अवलंब करत आणि आपल्या वाईट विचार प्रवृत्तीला खत पाणी घालत पुन्हा एकदा हिंदू देव-देवतांचा अपमान करत करोडो भक्तांच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. आता वेळ आलीय की फक्त यांच्या माफीनाम्यानं काहीच होणार नाही''. आदिपुरुष सिनेमा पुढील वर्षी १२ जानेवारी,२०२३ मध्ये रीलिज केला जाणार आहे.
राम कदम यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,''सिनेमातील सीन फक्त काढून चालणार नाही. अशा वाईट विचारप्रृत्तील धडा शिकवण्यासाठी आता सिनेमावर कायमची बंदी जाहीर करायला हवी आणि यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर देखील इंडस्ट्रीत काम करण्यासाठी काही वर्ष बंदी आणायला हवी''. राम कदम यांच्या म्हणण्यानुसार असं करायला हवं कारण भविष्यात पुन्हा असं कुणी करायची हिम्मत करणार नाही.
राम कदम यांनी याआधी देखील आदिपुरुष सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं तेव्हा म्हणजे ६ डिसेंबर,२०२० रोजी आपला विरोध दर्शवला होता. राम कदम सैफच्या एका वक्तव्यावर देखील भडकले होते,जे त्यांन एका मुलाखतीत केलं होतं. ''आदिपुरुष मध्ये जो रावण दिसेल तो वेगळा असेल,दयाळू असेल, त्याचे कर्म योग्यच होते असं दाखवलं जाईल'', असं काहीसं सैफ म्हटला आणि फसला होता. यानंतरच भाजप नेता राम कदम भडकले होते. त्यानंतर सैफनं माफी देखील मागितली होती.
सैफच्या या वक्तव्यानंतर राम कदम यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, ''अभिनेता सैफनं आदिपुरुषमधील त्याच्या व्यक्तिरेखेविषयी जे काही म्हटलंय ते धक्कादायक आहे. सैफचं म्हणणं आहे की रावणानं सीतेचं केलेलं अपहरण हे योग्यच, असं दाखवलं जाईल सिनेमात. रामाच्या विरोधात रावणानं केलेलं युद्ध देखील योग्यच असणार. हे काय आहे?''
राम कदम यांनी सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊतला टार्गेट करत ट्वीट केलं होतं. ज्यात लिहिलं होतं, ''त्यानं 'तानाजी' सिनेमा बनवला, ज्यात जगभरातनं पसंतीची पावती मिळाली. हे असं घडलं कारण यात हिंदूचा अभिमान आणि मराठीची अस्मिता जपली होती, पण आदिपुरुषमध्ये रावणाचे कर्म योग्य दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सीतेचं अपहरण सिनेमात योग्यच होतं असं सांगितलं गेलंय. असं आम्ही होऊ देणार नाही. दोन वर्ष आधी देखील मी म्हटलं होतं की सिनेइंडस्ट्रीत हिंदूच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जातोय. दुसऱ्या धर्मांप्रती असं बॉलीवूड करत नाही. पण हिंदूंना नेहमीच टार्गेट केलं जातं''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.