Ramayan controversy On Sita cut sleeves blouse: प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुषवरुन अजूनही वाद होताना दिसतो आहे. यासगळ्यात ९० च्या दशकांतील प्रसिद्ध मालिका रामायण यातील कलाकारांनी दिलेल्या मुलाखतीतून वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत.
रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेवर देखील दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्याचे कारणही भन्नाट होते. या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या सुनील लहरी यांच्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहे. प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या आदिपुरुष या चित्रपटावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद सुरु आहे.
Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?
सुनील लहरी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, रामानंद सागर यांनी सुरुवातीच्या काळात तीन पायलट प्रोजेक्ट शुट केले होते. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे आणि वातावऱण निर्मिती करणे हा त्यामागील उद्देश होता. मात्र त्यावेळी झालेल्या गोंधळामुळे आम्हाला माघार घ्यावी लागली. तो शो टेलिकास्ट करण्याला काही जणांनी विरोध केला होता. माहिती व प्रसारण खात्यानं विरोध केला होता. त्यांचे म्हणणे होते की, सीता मातेची जी वेशभूषा होती ती वादग्रस्त होती.
ब्लाऊजचे नवीन डिझाईन तयार करण्यात आले....
सुनील लहरी यांनी सांगितले की, आम्हाला केंद्राकडून काही सुचना आल्या होत्या. त्यामध्ये आम्ही मालिकेमध्ये काही बदल करावेत असेही सांगण्यात आले होते. सीता स्लिवलेस ब्लाऊज परिधान करुन शकत नाही असे सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. दूरदर्शनच्या वतीनं देखील विरोध करण्यात आला होता.
रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका रामायण यावर काही काळ बंदीही घालण्यात आली होती. लोकांच्या भावना खूप तीव्र होत्या. त्यामुळे आम्हाला तातडीनं काही निर्णय घ्यावा लागला. तो होता वेशभूषे संदर्भातला. त्यानंतर रामानंद सागर यांनी काही महत्वाचे बदल केले. सीतेची वेशभूषा त्यांनी बदलली. त्यामुळे हा शो तब्बल दोन वर्ष थांबवण्यात आला होता. असेही लहरी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.