Adipurush controversy timeline movie released prabhas kriti sanon om raut saif ali khan sakal
मनोरंजन

Adipurush: अखेर आदीपुरुष प्रदर्शित झालाच.. बंद पाडण्याची दिली होती धमकी.. काय होतं प्रकरण?

नीलेश अडसूळ

Adipurush latest update : ओम राऊत दिग्दर्शित (Om Raut) 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. आणि सकाळपासूनच चित्रपटगृहाच्या बाहेर रांगा पाहायला मिळत आहेत.

अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल झाले आहेत तर कुठे वेटिंग वर गेले आहेत. प्रेक्षक आवर्जून हा चित्रपट पाहत आहे. पण हे चित्र अलीकडेच बदलले आहे. कारण या चित्रपटावर टीजर पाहून अनेक टीका झाल्या होत्या. अक्षरशः हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी घोषणा देण्यात आली होती.

पण हळूहळू हा रंग निवळत गेला आणि अखेर प्रत्येकालाच उत्सुकता लागली ती प्रभू श्री रामाला म्हणजे आदिपुरुष चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघण्याची.. पण नेमकं असं काय घडलं होतं की 'आदिपुरुष'वर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती.. ते पाहूया..

(Adipurush controversy timeline movie released prabhas kriti sanon om raut saif ali khan)

झाले असे प्रभू श्री राम यांच्या चरित्रावर आधारित 'आदिपुरुष' चित्रपट येत असल्याची प्रचंड हवा झाली होती. कारण दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आधीचा 'तान्हाजी' हा चित्रपट प्रचंड विक्रमी कमाई करणारा ठरला होता.

त्यामुळे या चित्रपटात काय वेगळं असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा होती. त्यात 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास रामाची भूमिका साकारणार असल्याने अधिकच चर्चा झाली, अखेर ऑक्टोबर २०२२ मध्ये या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आणि सर्वांचाच भ्रमनिरास झाला.

या टिझरमध्ये अनेक गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या. चित्रपटात वापरण्यात आलेले VFX आणि रावणाची भूमिका यावरून या चित्रपटाला खूप ट्रोल केलं गेलं. रावण साकरणाऱ्या सैफ अली खानच्या कपाळावर भस्म नव्हते, रावण शिवभक्त असूनही त्याचे कपाळ मोकळे होते.

शिवाय सर्वच पत्रांच्या वेशभूषा नेटकऱ्यांना खटकल्या. रावण ड्रॅगनवर बसून आल्याने त्यावरही लोक बोलले. त्यामुळे पाहिलाच टीजर हा वादाला तोंड फोडणारा ठरला.

त्यानंतर दिग्दर्शक ओम राऊतवर नेटकऱ्यांनी आगपाखड करण्यास सुरुवात केली. त्या टीझरवरुन राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. भाजपनं, हिंदू महासभेनं तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. या चित्रपटाची प्रतिमा प्रचंड वादळी आणि वादग्रस्त झाली.

त्यानंतर दिग्दर्शक ओम राऊतने थोडा वेळ हवा आहे, असं सांगत चित्रपटात काही बदल केले. हे बदल झाल्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यावर प्रेक्षकांनी काहीशा सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान चित्रपटातील पत्रांचे, लुकचे फोटो पोस्ट करण्यात आले. चिडलेला हिंदू समाज प्रभावित होईल असे प्रमोशन करण्यात आले आणि तसा हळूहळू बदलही घडत गेला. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच एक फायनल ट्रेलर आला, त्यावर काहीशी पुन्हा टीका झाली पण प्रेक्षकांमधील उत्सुकता देखील वाढली.

आणि आखे आज चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षक गर्दी करत आहेत. अता त्यांना तो नेमका कसा वाटला हे थोड्याच वेळात कळेल. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू रामाच्या भूमिके आहे तर अभिनेत्री कृती सनन सीतेच्या भूमिकेत आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ आली खान तर हनुमानाच्या भूमिकेत मराठी अभिनेता देवदत्त नागे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Pager Blast: वायनाडच्या शिंप्याचा मुलगा नॉर्वेत कसा पोहचला? का चर्चेत आहे जोस टेलर

Latest Marathi News Updates : उच्च न्यायालयायाचा मोठा निर्णय! मुंबई सिनेटची निवडणुक उद्याच होणार

Ruturaj Gaikwad: फिल्डिंगमध्येही दिसला ऋतुचा 'राज', डाव्या हाताने भारी कॅच पकडत रियान परागला धाडलं माघारी

IND vs BAN, 1st Test: 'बॅड लाईट'मुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, भारताला विजयासाठी ६ विकेट्सटची गरज

OYO Hotels: आता अमेरिकेत सुद्धा होणार ओयोची हवा! 43 अब्ज रुपये गुंतवून घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT