adipurush final trailer out now VFX Still Woos Continues  SAKAL
मनोरंजन

Adipurush Trailer Final: प्रत्येक भारतीयाची कहाणी... गंडलेले VFX तरीही भावला आदिपुरुषचा अंतिम ट्रेलर

आदिपुरुषचा फायनल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय

Devendra Jadhav

Adipurush Final Trailer News: १६ जूनला आदिपुरुष सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. अशातच आदिपुरुषचा फायनल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या ट्रेलरची सर्वांना उत्सुकता होती.

कारण या ट्रेलरमध्ये दमदार ऍक्शन प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार होती. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषच्या अंतिम ट्रेलरची प्रेक्षक वाट पाहत होते. अखेर हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

(adipurush final trailer out now VFX Still Woos Continues)

या ट्रेलरमध्ये साधूच्या वेशात रावण सीतेकडे भिक्षा मागायला आला असतो. सीता जशी लक्ष्मणरेषा ओलांडते तसं रावण तिचं हरण करतो. श्रीरामांना या गोष्टीची खबर मिळताच त्यांना धक्का बसतो. जटायू रावणावर हल्ला करतो.

आणि मग पुढे वानरसेना रावणाच्या लंकेवर हल्ला करते आणि रावणाच्या ताब्यातून सीतेला पुन्हा अयोध्येत येते. श्रीराम रावणाचा वध करण्यास सज्ज असतात, अशा अनेक गोष्टी आदिपुरुषच्या शेवटच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतात.

आदिपुरुषच्या अंतिम ट्रेलरमध्ये VFX अजून गंडलेलेच दिसत आहेत. काही ठिकाणी कार्टून स्वरूपात माकडं दिसत आहेत. तरीही प्रेक्षकांना हा ट्रेलर आवडला आहे.

प्रत्येक भारतीयाची कहाणी अशा नावाखाली हा ट्रेलर रिलीज झालाय. एकूणच VFX मध्ये जरी दोष असला तरीही आदिपुरुषचा ट्रेलर प्रेक्षकांना भावला असून सिनेमा पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.

दरम्यान तिरुपतीमध्ये प्रभासच्या आदिपुरुषच्या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्तानं जी तयारी करण्यात आली आहे ती मोठी होती.

आदिपुरुषचा जो इव्हेंट आहे तो श्री वैंकटश्वेरय्या विद्यापीठाच्या मैदानात होणार आहे. त्यासाठी प्रभासचे ५० फुटांपेक्षा अधिक उंचीचे कट आऊट्स तयार करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

१६ जून रोजी हा चित्रपट भारतभरात सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.ओम राऊतच्या या चित्रपटामध्ये साऊथचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानं प्रभु श्रीराम यांची भूमिका साकारली आहे.

याशिवाय बॉलीवूडचा स्टार अभिनेता सैफ अली खान यांन रावणाची तर क्रिती सेनननं सीतेची भूमिका साकारली आहे. यासगळ्यात आदिपुरुषच्या निमित्तानं टॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर कुतूहल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT