Adipurush Prabhas-Kriti Sanon: Esakal
मनोरंजन

Adipurush: आदिपुरुषला मोठा फटका! रिलिजच्या काही तासातच या वेबसाइटवर HD मध्ये सिनेमा लीक!..

Vaishali Patil

अखेर बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांचा चित्रपट ' आदिपुरुष ' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सूक होते.

आता चित्रपट रिलीज झाला असुन चाहत्यांच्याही प्रतिक्रिया येवु लागल्या आहेत. यात प्रभू रामाची भुमिकेत प्रभास आणि जानकीच्या भुमिकेत क्रिती सेनॉनला पाहिल्यानंतर नेटकरी त्यांचे खूप कौतुक करत आहे. तर काहींनी चित्रपटाच्या VFX वर नाराजी व्यक्त केली आहे.

मात्र आता 'आदिपुरुष' संबधित मोठी बातमी समोर आली आहे. त्यांमुळे या चित्रपटाच्या कमाईला फटका बसण्याची शक्यता आहे. प्रभास आणि क्रिती सेनॉनचा चित्रपट पायरेसीचा बळी झाला आहे.

प्रभास आणि क्रिती सेनॉनचा चित्रपट 'आदिपुरुष' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही क्षणातच इंटरनेटवर लीक झाला असल्याच्या दावा वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

तमिळरॉकर्स, फिल्मझिला, मूवीरुल्झ सारख्या अनेक पायरसी वेबसाइटवर हा चित्रपट उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे तेथे प्रेक्षक केवळ चित्रपट पाहू शकत नाहीत तर तो डाउनलोड देखील करू शकत आहे.

हा चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. 'आदिपुरुष' पायरसी वेबसाइटवर 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD मध्ये उपलब्ध आहे.

त्यांमुळे याचा फटका चित्रपटाला बसेल यात काही शंका नाही. आता या समस्येवर आदिपुरुषचे निर्माते आणि टिम काय पाउल उचलते याकडे लक्ष लागले आहे.

चित्रपट 2D आणि 3D मध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट पहिल्याच दिवशी 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय करेल अशी अपेक्षा आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.


प्रभास आणि क्रिती व्यतिरिक्त सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत, देवदत्त नाग बजरंगच्या भूमिकेत, वत्सल सेठ मेघनाथच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सोनल चौहान आणि तृप्ती तोरडमल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT