Adipurush Box Office Collection Day 8: ' आदिपुरुष ' हा सिनेमा रिलिज होण्यापुर्वीच असं काहीस वातावरण तयार करण्यात आलं की त्यामुळे हा चित्रपट आता इतिहास घडवणार असं वाटलं.
चित्रपटाचा टिझर रिलिज झाला वाद झाला, नंतर पोस्टर आले वाद झाला त्यानंतर ट्रेलर आला, त्याला मात्र चागंला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला मग तर राडाच झाला.
चित्रपटाबाबत असणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा अन् कमाई बाबात असणाऱ्या निर्मात्यांच्या अपेक्षा दोन्ही मातीत मिळाल्या. चित्रपटाची क्रेझ आणि दणक्यात करण्यात आलेलं प्रमोशन यामुळे पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर खुपच गर्दी केली.
त्यानंतर चित्रपटाबाबत आलेला रिव्ह्यू आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे चित्रपटाच्या कमाईलाच नजर लागली.
पहिले दोन दिवस चित्रपटाने केलेल्या कमाईनंतर 600 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला चित्रपट दसऱ्याच्या दिवशी जाळण्यात येणाऱ्या रावणासारखा धडकन खाली आपटला.
या चित्रपटाच्या कमाईला उतरती कळा लागली आणि आता तर कमाईवर फुलस्टॉप लागण्याची वेळ आली आहे.
आता 'आदिपुरुष' चे शो रिलिज नंतर अवघ्या आठवडाभरातच रद्द होऊ लागले आहेत. थिएटर मालक आता या चित्रपटाचे शो कमी करत आहेत कारण चित्रपटाला तितकासा प्रतिसाद मिळत नाही आहे.
रिलीजच्या आठव्या दिवशी 'आदिपुरुष'ने आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली आहे. त्यामुळे निर्माते आणि कलाकार आता निराश झाले आहेत .
sacnilk या वेबसाइटने दिलेल्या अहवालानुसार, 'आदिपुरुष'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन 8 व्या दिवशी फक्त 3.4 कोटींवर आहे. या आकडेवारीनंतर 8 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 263.3 च्या जवळपास कमाई केली आहे .
सातव्या दिवशी, चित्रपटाने 4.85 कोटी कमावले होते, त्यापैकी हिंदीमध्ये 2.9 कोटी आणि तेलुगूमध्ये 1.7 कोटी कमावले होते.
या चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने केवळ सहाव्या दिवसापर्यंत जगभरातील आकडा शेअर केला आहे.
त्यानुसार त्याची कमाई 410 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. टी-सीरीजने आपल्या ट्विटर हँडलवर 7व्या आणि 8व्या दिवसाची कमाई जाहिर केलेली नाही. या आकडेवारीनुसार आता हा चित्रपट निदान बजेट इतकी कमाईदेखील करु शकतो की नाही यात शंकाच आहे.
याच कमाईच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने आता या वर्षाच्या सार्वधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादित तिसरा क्रमांकावर स्थान मिळलं आहे. बॉलीवूड हंगामा नुसार, 'द केरळ स्टोरी' आणि 'पठाण' नंतर 'आदिपुरुष' हा यावर्षी 200 कोटींचा टप्पा पार करणारा तिसरा चित्रपट आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.