Adipurush Movie  esakal
मनोरंजन

Adipurush Movie : 'तू काय खरोखरची सीता नाही! तेव्हा जरा...' नेटकऱ्यांनी क्रितीचे टोचले कान

क्रिती सेनननं सोशल इंस्टावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामुळे ती ट्रोल झाली आहे. पहिल्या फोटो स्वताचा ठेवून त्याला जानकी असं कॅप्शन दिलं आहे.

युगंधर ताजणे

Adipurush Movie Kriti Sanon Trolled Sita Insta Post Mother : आदिपुरुषच्या प्रदर्शनासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना दुसरीकडे त्यावरुन मोठ्या वादाला सुरुवातही झाली आहे. आता या चित्रपटामध्ये माता सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री क्रिती सेननला नेटकऱ्यांनी चांगलीच समज दिली आहे.

क्रिती सेनननं सोशल इंस्टावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामुळे ती ट्रोल झाली आहे. पहिल्या फोटो स्वताचा ठेवून त्याला जानकी असं कॅप्शन दिलं आहे. दुसरा फोटो हा तिच्या आई गीता यांचा आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी क्रितीचा चांगलाच क्लास घेतला आहे. नेटकऱ्यांनी क्रिती सेननला पोस्ट करताना काय काळजी घ्यावी याविषयी सांगितलं आहे. Adipurush Movie Kriti Sanon

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

एका युझर्सनं लिहिलं आहे की, कोणत्याही अभिनेत्रीची तुलना ही माता सीतेशी होऊ शकत नाही. कुणी तसा प्रयत्नही करु नये. आमच्या मनात माता सीतेची वेगळी ओळख आहे. ती कुणीही मलिन करण्याचा प्रयत्न करु नये. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, कुणीही राम आणि सीता यांची भूमिका करु दे, मात्र ती भूमिका करणारे कलाकार आहेत. साधी माणसं आहेत. पण त्यांनी आपल्या मर्यादांचे भान ठेवावे. दुसरी गोष्ट म्हणजे दीपिका चिखलिया आणि अरुण गोविल यांच्या सारखी भूमिका कुणी साकारु शकत नाही. असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

१६ जून रोजी आदिपुरुष थिएटमध्ये होणार प्रदर्शित....

प्रभास आणि क्रिती सेननची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष हा १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. सोमवारी आदिपुरुषची २५ हजार तिकीटं बूक झाल्याची बातमी सुत्रांनी दिली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवणार असल्याचे बोलले जात आहे.

आदिपुरुष हा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांनी केले आहे. ४०० कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. सुरुवातीच्या काळात या चित्रपटावरुन देखील मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर दिग्दर्शकानं त्यात काही बदल केल्याचेही सांगण्यात आले आहे.

ओम राऊत यांच्या या चित्रपटामध्ये प्रभू श्रीरामाची भूमिका प्रभासनं साकारली असून सीतेची भूमिका क्रिती सेनननं केली आहे. तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. आदिपुरुषच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. चाहत्यांनी ओम राऊत आणि कलाकारांवर कौतूकाचा वर्षाव केला होता. आदिपुरुषच्या ३ डी व्हर्जननं आतापर्यत जगभरामध्ये अॅडव्हान्स बुकींगच्या माध्यमातून २.८० तर जगभरातून ३.६५ कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Maharashtra Assembly Election Result : जोगेश्वरी मध्ये लोकसभेनंतर विधानसभेतही फेर मतमोजणीची मागणी, हायकोर्टात याचिका दाखल करणार

SCROLL FOR NEXT