Adipurush 10 reasons why you should not watch adipurush  Esakal
मनोरंजन

Adipurush: रामायणाची सुमार कॉपी! आदिपुरुष न पाहण्याची दहा कारणं एकदा वाचाच

Vaishali Patil

आदिपुरुष हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासूनच चर्चेत होता. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काल म्हणजे 16 जून रोजी प्रदर्शित झाला. मात्र प्रदर्शनानंतर या चित्रपटावर कडाडून टिका केली आहे. आता या चित्रपटात अनेक चुका आहेत. जर तुम्ही चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर चित्रपटातील या दहा चुका नक्कीच वाचा.

चित्रपटाचे नाव: रामायणात आधारित या चित्रपटाचे नाव आदिपुरुष का ठेवण्यात आले हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर या प्रश्नाच उत्तर मिळेल या आशेने गेलेले प्रेक्षक मात्र निराश होतात कारण चित्रपटाच्या नावाचा आणि चित्रपटाच्या कथेचा कसलाच संबंध नाही.

डायलॉग: पौराणिक चित्रपटांमध्ये सहसा शुद्ध हिंदी भाषेचा वापर केला जातो मात्र आदिपुरूष मध्ये चित्रपटाचा आणि डायलॉग काहीच संबंध होत नाहीत. सभ्य भाषेचा खुप अभाव आहे. संवाद ऐकल्यानंतर तुम्हीही डोक्याला हात लावाल. रावण आणि सीता संवाद सोडून बाकीचे सर्व संवाद खूपच वाईट आहेत. नेटकऱ्यांनी तर या भाषेला टपोरी म्हटलं आहे.

लूक आणि ड्रेस: राम, सीता आणि हनुमान यांच्याशिवाय कुणाचेही कपडे व्यवस्थीत दिसत नाहीत. लकेंश तर काळ्या टी शर्ट मध्ये दिसतोय. वास्तविक कपड्याऐवजी gfx पासून बनवलेल्या कपड्यांमुळे पात्रांच महत्वही कमी झालं आहे.

रावणाची हेअरस्टाईल पाहून तर नेटकऱ्यांनी डोक्याला हातच लावला आहे. रावणापासून ते इंद्रजीत, कुंभकर्ण, विभीषण, अगदी ब्रह्मदेव यांची देखील मॉर्डन अरस्टाईल आहे. रावणाची हेयरस्टाईल तर गजनीच्या अमीर सारखीच आहे.

VFX: चित्रपट फ्लॉप होण्याचं सर्वात मोठ कारण म्हणजे चित्रपटात वापरण्यात आलेलं VFX. राम, लक्ष्मण, सीता हनुमान, रावण शूर्पणखा, रावणाची बोयको यांसहसह संपूर्ण चित्रपटात 20 च्या आसपास कलाकार असतील. बाकी सर्व VFX वाली सुग्रीव, अंगद, जामवंत, नल नील, सुबाहु मारीच वानर सेना, दानव सेना हे सगळे VFXमध्ये खुपच विचित्र अवतारात दाखवण्यात आले आहे. राक्षसांच्या चेहऱ्यावर मास्क आहे. तर कुठे रावणालाच वेल्डिंग करतांना दाखवलं आहे. ज्यावेळी हनूमानाची शेपुट जाळली जाते आणि तो पुर्ण लंका जाळतो त्या सीननंतर VFX किती गंडलं आहे या प्रत्यय येतो.

लायटिंग: चित्रपटात लायटिंगची देखील मोठी अडचण आहे. फिल्म मध्ये इतक्या ठिकाणी चुकीची लायटिंग आहे की फक्त भगवान रामालाचा उजेडात दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात लाईटिंगच सगळचं गणित बिघडलं आहे.

काळा काळा पडद्या: एक गोष्ट विचित्र वाटली की संपूर्ण चित्रपटाने राखाडी, गडद राखाडी, काळा धूसर आकाश, अस्पष्ट चित्र असा वापर करण्यात आलेला आहे. सर्वत्र फक्त काळा अंधार दिसतो ज्यामुळे स्क्रिनवर काय दिसतयं हेही कळतांना प्रेक्षकांचा गोंधळ होतो.

काळी अन् कोळश्याची लंका: रावणाची लंका सोन्याची होती हे तर आपण सर्वांनीच लहानपणापासून ऐकलं होतं. मात्र आदिपुरुषमधील लकेंशची लंका ही काळी आणि कदाचित कोळश्याची आहे. सर्वत्र काळे दगड आणि काळ्या भिंती दिसतात. युध्दाच्या वेळी तर कुठला मजला आणि कुठली भिंत हे काहीच समजत नाही.

Bypassed narrative :जगात रामायणाच्या हजारो आवृत्त्या आहेत. ज्यात रामायणाची कथा आहे . सर्वांनाच ही कथा माहित असवी मात्र आदिपुरुष पाहतांना तुमच्या अपेक्षा भंग होतात. रामायणाच्या कथेचा आणि आदिपुरुषमधल्या कथेचा काहीच संबंध नाही. लेखकाने आपआपल्या पद्धतीने रामकथा लिहिली आणि सांगितली आहे असं वाटतं.

भावनेचा अभाव : भावनांचा आभाव ही या चित्रपटात सर्वात मोठी कमतरता आहे. सीता हरण ते लक्ष्मणाच्या बेशुद्ध होण्यापर्यंत रामाच्या चेहऱ्यावर कसलाच भाव नसतो. पुर्ण चित्रपटात प्रभासच्या चेहऱ्यावरचे भाव सारखेच आहेत. तो ना हसतांना दिसतो ना भावनिक झालेला. क्रितीनेही काही सीन्समध्ये ओव्हर अॅक्टिंग केल्याच दिसत.

कथेतील विक पॉईंट: कथा अनेकवेळा भरकटल्याच दिसत. हनुमानाला सीता सापडण्यापूर्वीच सर्व वानरसेना रामसागर किनाऱ्यावर पोहोचते. किष्किंधामध्ये राम हा सुग्रीवाचा राजतिलक करतो. मात्र खऱ्या रामायणात त्याला फक्त जंगलात राहायची परवानगी होती. कुंभकर्ण आणि हनुमान यांच्या परस्पर युद्धात राम कुंभकर्णावर बाण चालताना दिसत आहेत.

युद्ध: जेव्हा युद्ध सुरु होत तेव्हा खरी डोकदुखी सुरु होते. अंधारात काहीच दिसत नाही. हे दृश्य कुठेच दिसत नाही. खुपच खराब VFX आणि म्युझिक खुपच खराब प्रस्तूत केलं आहे. एंदरित खुप मोठ्या अपेक्षा ठेवून आणि काही तरी भन्नाट पाहण्याचा विचार करुन चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांची आदिपुरुष निराशा करतो आणि याच कारणामुळे 600कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला चित्रपट रिलिजच्या पहिल्याच दिवशी आपटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT