Adipurush Om Raut Director viral memes social media  esakal
मनोरंजन

Adiuprush memes : 'कट्टापानं बाहुबलीला मारलं कारण त्यानं 'आदिपुरुष' पाहिला होता'!

आदिपुरुषबाबत प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतूरतेनं वाट पाहत होते.

सकाळ डिजिटल टीम

Adipurush Viral Memes On Social Media : ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष प्रदर्शित झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या क्रिएटिव्हीटिला उधाण आल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक आणि मेकर्स यांच्यावर सडकून टीका केली आहे.

आदिपुरुषबाबत प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतूरतेनं वाट पाहत होते. प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद संख्येनं मोठा असला तरी त्याच्यावर टीका करणारे काही कमी नाहीत हे सांगावे लागेल. विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांनी आदिपुरुषवर सडकून टीका केली आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

आमच्या मनात राम आणि रामायण याविषयी जी प्रतिमा आहे ती मोडण्याचा प्रयत्न या चित्रपटानं केल्याचा आऱोप प्रेक्षकांनी केला आहे. काहींनी तर दिग्दर्शकानं वेगळेपणा आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काय करुन ठेवले आहे, त्याला काय सांगायचे आहे हेच समजत नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून आदिपुरुषची निर्मिती करण्यात आली मात्र त्याला प्रेक्षकांनी नावं ठेवली आहेत.

आदिपुरुषमधील पात्रांच्या तोंडी असलेले संवाद प्रेक्षकांना आवडलेले नाहीत. त्यातील दृष्यरचना, व्हिएफएक्स, ग्राफीक्स आणि ज्या नवीन तंत्रज्ञानाविषयी सांगितले जात होते त्या मोशन पिक्चरचा प्रभाव सुमार दर्जाच्या असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी, नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. यासगळ्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ज्या पोस्ट आहेत त्या कमालीच्या भन्नाट आहेत.

काहींनी हनुमानाच्या मेक अपवरुन दिग्दर्शकाला धारेवर धरले आहे. हनुमानाच्या तोंडी जे संवाद आहे त्याचीही थट्टा उडवण्यात आली आहे. यासगळ्यात बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी देखील आदिपुरुषवर टीका केली आहे. यापूर्वी टीव्हीवर रामायणावर आधारित ज्या मालिका होत्या त्यांचा दर्जा उच्च होता. या चित्रपटानं निराशा केल्याचे शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे.

आम्हाला रामापेक्षा रावणाची भूमिका करणारा सैफ आवडला....

अनेकांनी सोशल मीडियावर रामाची भूमिका करणारा प्रभास आणि रावणाची भूमिका करणारा सैफ अली खान यांच्यात तुलना केली आहे. त्यात त्यांना सैफची भूमिका सरस वाटली आहे. एका युझर्सनं सैफचं कौतूक करताना लिहिलं आहे की, गेल्या काही वर्षांपासून सैफ च्या व्हिलनच्या भूमिका करतो आहे त्यात त्यानं प्रभावी काम केलं आहे. आदिपुरुषमध्ये तर रावण हा रामापेक्षा अधिक प्रभावी वाटतो. अशा प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Maharashtra Election Result 2024 : अकोल्यात तीन ठिकाणी कमळ फुलले; बाळापूरात ‘मशाल’ तर पश्चिममध्ये ‘पंजा’ जिंकला

SCROLL FOR NEXT