adipurush controversy Esakal
मनोरंजन

Adipurush Row: ये रामायण दिखाओगे ? नालासोपाराच्या थिएटरमध्ये 'आदिपुरूष' चा शो बंद पाडला

Vaishali Patil

Adipurush controversy: साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार प्रभास आणि बॉलीवूडची अभिनेत्री क्रिती सेनॉनचा चित्रपट 'आदिपुरुष' रिलीज होऊन तीन दिवस उलटले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापुर्वी या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती मात्र आता बहुतेक लोकांनी या चित्रपटाला विरोध केला आहे.

'आदिपुरुष' चित्रपटातील काही सीन, संवाद आणि कलाकारांचे लूक याला प्रेक्षकांचा कडाडून विरोध होत आहे. प्रभू श्रीराम आणि रामायणाबाबत अनेक चूकीच्या गोष्टी दाखवल्या जात असल्याचा आरोप सातत्याने चित्रपटाच्या निर्मात्यांवर होत आहे.

त्यातच काही हिंदू संघटनानी तर आक्रमक चित्रपटाविरोधात आक्रमक पावित्राच घेतला आहे. हिंदू संघटनांच्या सदस्यांनी मल्टिप्लेक्सच्या कर्मचार्‍यांशी हुज्जत घातल्याचा प्रकार रविवारी घडला आहे.

पालघरच्या नालासोपारा येथील एका मल्टिप्लेक्समध्ये रविवारी आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होत असताना काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी गोंधळ खुपच घातला. आमच्या देवी देवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं म्हणत त्यांनी चित्रपटगृहात 'जय श्री राम' च्या घोषणा दिल्या. त्याचबरोबर बॉलिवूडवर देखील निशाणा साधला.

आंदोलकांनी चित्रपटाचे प्रदर्शनही थांबवले आणि जोरदार घोषणाबाजी केली. इतकच नाही तर त्यांची आणि मल्टिप्लेक्स कर्मचाऱ्यांची शाब्दिक बाचाबाची झाली आहे. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.


भगवान हनुमान आणि मेघनाथ यांच्या पात्रांसाठी खास लिहिलेले संवाद, 'जो हमारी बिना को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगाएंगे', 'कपडा तेरे बाप, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, जलेगी भी तेरे बाप की', ' तुझ्या मावशीच्या बागेत हवा खायला आली आहे?' जसे संवादामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आहे.

या चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर नेपाळमध्ये या चित्रपटाला प्रचंड विरोध होत असून या चित्रपटामुळे नेपाळमध्ये सर्व हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. वाद अन् विरोध होत असतांनाही चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 67 कोटींची कमाई केली आहे.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू; काँग्रेस,‘आप’सह विरोधी पक्षांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

CIDCO Lottery: नवी मुंबईत सिडकोच्या 26 हजार घरांची 'या' तारखेला निघणार लॉटरी; बोर्ड मिटींगमध्ये ठरला मुहूर्त

Pune : कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज यांच्याविरोधात आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pune Viral Video: कारची काच खाली करायला सांगितलं.. लाथा घातल्या; ऑटोरिक्षा चालकाच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT