Adipurush Starcast Fee Esakal
मनोरंजन

Adipurush Starcast Fee: प्रभासपासून क्रिती, सैफपर्यंत सगळ्यांनीच 'आदिपुरुष' साठी घेतलंय तगडं मानधन..वाचा

'आदिपुरुष'च्या बजेटमध्ये 'पठाण' सारखे दोन सिनेमे बनले असते अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Adipurush Starcast Fee: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमा एक मोठा ग्रॅन्ड प्रोजेक्ट आहे. याचं बजेटही भारी भरकम आहे. प्रभास,कृति सनन पासून सैफ अली खान सारख्या मोठ्या स्टार्सचा भरणा असलेला 'आदिपुरुष' सिनेमा १६ जून २०२३ रोजी रिलीज होत आहे. जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झाली आहे,तेव्हापासूनच सिनेमा चर्चेत आहे.

सर्वात आधी सिनेमाचा टीझर रिलीज झाला तेव्हाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला. तेव्हा निर्मात्यांनी सिनेमाच्या व्हीएफएक्समध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.तेव्हाच बातमी समोर आली होती की या सगळ्या बदलांमुळे सिनेमाचं बजेटही बरंच वाढलं. त्यामुळे हे सगळं ओझं निर्मात्यांवर आलं असणार हे निश्चित. यादरम्यानच आता समोर आलं आहे 'आदिपुरुष'च्या स्टारकास्टचं तगडं मानधन.

आदिपुरुष या सिनेमासाठी सैफपासून प्रभास पर्यंत सर्वांनीच सिनेमासाठी तगडं मानधन घेतलं आहे. ज्यामुळे सिनेमाचं बजेट बोललं जातंय की ७०० करोडवर पोहोचलं आहे. या बजेटमध्ये म्हणे 'पठाण' सारखे दोन सिनेमे बनवता आले असते.

'पठाण'चं बजेट ३०० ते ३५० करोड इतकं होतं. चला जाणून घेऊया 'आदिपुरुष' साठी कोणी किती मानधन घेतलं आहे.(Adipurush Star Cast budget prabhas kriti sanon saif ali khan charge big for 700 crore) budget movie

टी-सीरिज बॅनर अंतर्गत बनलेल्या 'आदिपुरुष' सिनेमाविषयी मोठा दावा केला जात आहे की या सिनेमासाठी प्रभासनं १५० करोड मानधन वसूल केलं आहे. स्पॉटबॉय च्या रिपोर्टनुसार बाहुबली स्टार प्रभास लवकरच 'प्रोजेक्ट-K' सोबतच 'सालार' सारख्या सिनेमातही दिसणार आहे.

तर आदिपुरुष सिनेमासाठी क्रिती सननं आपलं मानधन वाढवलं होतं. एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की क्रितीनं ३ करोड रुपये मानधन आकारलं आहे, अर्थात अद्याप या मानधनाविषयी अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

तर रावणाच्या भूमिकेसाठी सैफ अली खाननं देखील मोठं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. प्रभासला सैफनं दिलेली तगडी टक्कर पहायला सगळेच उत्सुक आहेत. सैफनं या भूमिकेसाठी १२ करोड रुपये मानधन आकारल्याचं बोललं जात आहे.

तर सनी सिंग 'आदिपुरुष' मध्ये श्रीरामाचे छोटे भाऊ लक्ष्मण यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी सनीला १.५ करोड रुपये मानधन मिळाल्याचं बोललं जात आहे. कलाकारांच्या या तगड्या मानधनामुळे आणि ग्रॅन्ड प्रोजेक्टमुळे सिनेमाचं बजेट ७०० करोडवर पोहोचलं आहे. अर्थात या सगळ्या आकड्यांविषयी निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

रिपोर्ट्सनुसार,'आदिपुरुष' साठी निर्मात्यांची पहिली पसंत रामचरण,अल्लू अर्जून आणि महेश बाबू होते. पण या कलाकारांसोबत गोष्टी जुळून आल्या नाहीत तेव्हा स्क्रीप्ट प्रभासकडे गेली आणि प्रभासनं लागलीच स्क्रीप्टला आपली सहमती दर्शवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT