Aditya Raj Kapoor Son of Shammi Kapoor Graduates age 67 Degree  
मनोरंजन

Aditya Raj Kapoor Graduates : वयाच्या ६७ व्या वर्षी शम्मी कपूर यांचे चिरंजीव 'ग्रॅज्युएट'!

यापूर्वी देखील कित्येक सेलिब्रेटींनी त्यांच्या पन्नाशीनंतर शिक्षण पूर्ण केल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Aditya Raj Kapoor Son of Shammi Kapoor Graduates age 67 Degree : असं म्हटलं जातं की, शिकण्याचं कोणतंही वय नसतं. तुमच्यात शिकण्याची ताकद असेल तर तुम्ही कोणत्याही वयात मोठी शैक्षणिक अर्हता प्राप्त करु शकतात. त्यामुळेच की काय सरत्या वयातही अनेकांनी मोठी शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्याचे दिसून येते.

सोशल मीडियावर सध्या बॉलीवूडमधील एका अभिनेत्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्या अभिनेत्यानं वयाच्या ६७ व्या वर्षी पदवीधर होण्याचा मान मिळवला आहे. बॉलीवूडचे दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांचे चिरंजीव आदित्य राज कपूर यांनी पदवीधर झाल्यानंतर खास पोस्ट शेयर केली आहे. त्याची चर्चा सुरु आहे. त्यांनी पोस्ट करताच त्यावर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Also Read : Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

यापूर्वी देखील कित्येक सेलिब्रेटींनी त्यांच्या पन्नाशीनंतर शिक्षण पूर्ण केल्याचे दिसून आले आहे. आदित्य यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, मला आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावर फारच उशीरानं शिक्षणाचे महत्व कळाले. म्हणून मी आता पुन्हा शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. त्यात यशस्वीही झालो आहे. याचा विशेष आनंद आहे.

मला यासाठी माझी मुलगी तुलसीनं प्रोत्साहित केले. तिची प्रेरणा खूपच महत्वाची ठरली. तिनं तर मला आत्मविश्वास दिला नसता तर मग मला हा प्रवास शक्य झाला नसता. आता तर आपण पदवीधर झाल्यानंतर द्विपदवीसाठी देखील अर्ज करणार आहोत. आणि इग्नुमधून त्यासाठी प्रवेश फॉर्म भरणार आहे.

आदित्य यांनी सोशल मीडियावर त्यांच्या गुणपत्रिकेचा फोटो पोस्ट केला असून त्यावर त्यांना नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे कौतुकही केले आहे. आदित्य यांनी तो फोटो शेयर करताना आपले फार मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. मी आईची इच्छा पूर्ण केली आहे.

आदित्य यांनी ई टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आता माझ्याकडे पुढे शिक्षणासाठी आणखी वेळ आहे. आणि त्यासाठी कारण देखील आहे. मी पदवीधर झालो आहे. द्विपदवीधर होण्याचाही माझा प्रयत्न असणार आहे. मी तत्वज्ञान हा विषय घेऊन पदवीधर झालो आहे. असे आदित्य यांनी तो फोटो शेयर करताना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT