मनोरंजन

तालिबान्यांचा 'जीममध्ये वर्कआऊट', अदनान सामी भडकला

भारताला सर्वात जवळ असणारा देश अफगाणिस्तान हा गेल्या काही दिवसांपासून वेगळया संकटातून जाताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

जगात सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. ती म्हणजे तालिबान आणि त्यांचा दहशतवाद. काही दिवसांपूर्वी त्यांनी अफगाणिस्तानवर आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांनी केलेला हिंसाचार, रक्तपात, या साऱ्या गोष्टी त्यांनीच सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. विमानाला लटकून काही करुन देश सोडण्याची इच्छा तेथील लोक व्यक्त करताना दिसत आहे. जेव्हापासून तालिबान्यांनी सगळी सुत्रं आपल्या हातात घेतली आहे तेव्हापासून त्यांनी आपली दहशतीची ताकद लोकांना दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काल राष्ट्रपती भवनात जेव्हा तालिबानी घुसले तेव्हा त्यांनी तिथेही व्हिडिओ शुट केला. तो ही जाम व्हायरल झाला आहे.

१५ ऑगस्टला तालिबान्यांनी अफगाणिस्तानला आपल्या ताब्यात घेतलं. त्यांनी सुरुवातीला काबूलमध्ये हल्ला केला होता. त्यापूर्वी त्या देशाचे राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून गेले होते. पूर्ण देश ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. अफगाणिस्तानवर हल्ला करुन ते शहर काबीज केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये ते वर्कआउट करताना दिसत आहे. तालिबान्यांच्या त्या व्हिडिओवर प्रख्यात गायक अदनान सामीनं नाराजी व्यक्त केली आहे. त्याची ती प्रतिक्रियाही व्हायरल झाली आहे.

आपल्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अदनान सामी यांनी तालिबानी आणि त्यांच्या त्या वेगवेगळ्या व्हिडिओवर परखड प्रतिक्रिया दिल्या आहेत. अदनाननं अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल केले आहेत. त्यावर टिप्पणी केली आहे. त्याच्या त्या प्रतिक्रियाही चर्चेत आल्या आहेत. आता एक व्हिडिओ शेयर करुन अदनानं अमेरिकेवर टीका केली आहे. त्यानं आणखी एक व्हिडिओ शेयर करुन त्या व्हिडिओमध्ये तालिबानी जीम करत असल्याचे दिसुन आले आहे. अदनानं यांनी लिहिले आहे की, डियर अमेरिका तुम्ही या लोकांपासून कसे काय हरलात, सोशल मीडियावर अदनानचं ते व्टिट मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले आहे.

भारताला सर्वात जवळ असणारा देश अफगाणिस्तान हा गेल्या काही दिवसांपासून वेगळया संकटातून जाताना दिसत आहे. त्यांच्या देशाला आता तालिबान्यांनी आपल्या कब्ज्यात घेतलं आहे. हृदयद्रावक फोटो आणि व्हिडिओ सतत व्हायरल होत आहेत. यासगळ्या प्रकरणावर देशातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री यांनी याप्रकरणी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्हायरल केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT