अद्वैत दादरकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक. अद्वैत दादरकर हा गेले वर्षभर झी मराठीचा फिक्शन हेड म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
आता या जबाबदारीतून अद्वैत मोकळा झालाय. अद्वैतने याविषयी सोशल मिडीयावर पोस्ट करुन त्याचा अनुभव शेअर केलाय.
(adwait dadarkar resigned from zee marathi fiction head)
अद्वैत दादरकर लिहीतो, "झी मराठी...माझ्यासाठी हा चॅनल नाही.. Emotion होती..आहे आणि यापुढेही असेल..स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मी कधी Corporate Job करेन..पण 9 मार्च 2022 ते 19 सप्टेंबर 2023..साधारण दीड वर्ष केला बाबा..
Zee Marathi - Fiction Head.. एवढी मोठी जबाबदारी..त्या साठी सर्वात आधी माझ्या वर एवढा विश्वास दाखवला म्हणून PM Sir, अमीत सर,निलेश मयेकर,कल्याणी सगळ्यांचे मनापासुन आभार.."
अद्वैत दादरकर पुढे लिहीतो, "ह्या संपूर्ण दीड वर्षात प्रचंड काम केलं..कधी थकलो..कधी समाधान मिळालं..कधी यश मिळालं..जास्त अपयशच मिळालं..धडपडलो..भांडलो..वाद घातला..कधी कठोर निर्णय घ्यावे लागले..ह्या सगळ्यात एक माणूस म्हणून घडलो..
हे सगळे अनुभव..नवीन जग..गोष्ट सांगण्याची प्रत्येक वेळेला नवीन पद्धत शोधणं..गोष्टीच्या..पात्रांच्या..त्यांच्या भावनांच्या खोलात शिरून..प्रेक्षकांना खरेपणाचा..अस्सल अनुभव देण्या साठी झी मराठी नेहमीच झगडते तसे आम्ही सुद्धा झगडलो.."
अद्वैत दादरकर पुढे लिहीतो, "ही सगळी माणसं माझ्या नुसती आयुष्यात आली नाहीत..तर आयुष्याचा भाग बनली..आणि शेवटी आठवणी माणसंच तयार करतात..ह्या दीड वर्षातल्या काही आठवणी..
पण झी मधल्या प्रत्येक डिपार्टमेंट मधल्या प्रत्येकाला thank you so much.. आणि fiction team तुम्हाला विशेष thanks..तुम्ही सुद्धा तुमचा बॉस म्हणून मला अगदी सहज स्वीकारलत.."
अद्वैत दादरकर शेवटी लिहीतो, "खूप miss करेन सगळ्यांना..आत्ता प्रत्येक what's app group मधून बाहेर पडताना सुद्धा हात जड झाले काही सेकंद.. डोळ्यात पाणी आलच..आपण टीम म्हणून एकत्र केलेलं काम.. मजा मस्करी..किस्से..सगळं खूप miss करेन..
कधी कोणाला दुखावलं असेन तर Sorry आणि ह्या संपूर्ण गोड अनुभवासाठी सगळ्यांचे मनापासून आभार..मला खात्री आहे..लवकरच झी मराठी चे जुने दिवस..तो अभिमान..सगळं परत येईल..All the best आणि मी मराठी..झी.मराठी.."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.