Aftab Shivdasani: 'मिस्टर इंडिया' चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारा अभिनेता आफताब शिवदासानीची ऑनलाईन फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आफताब शिवदासानी ला 1.50 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. त्याची ऑनलाइन फसवणुक करण्यात आली आहे.
आफताबला एका मोबाईल क्रमांकावरुन एक संदेश आला होता. या संदेशात,"प्रिय AXIS खाते वापरकर्ता, तुमचे खाते आज निलंबित केले जाईल, कृपया ताबडतोब पॅन-कार्ड अपडेट करा. खालील लिंकवर क्लिक करा - असे लिहिले होते.
आफताबने त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याला एका व्यक्तीचा फोन आला ज्याने स्वत:ची ओळख बँक अधिकारी म्हणून सांगितली.
त्याने आफताबला मोबाईल नंबर आणि पिन नंबर टाकण्याची विनंती केली. आणि काही वेळातच त्याच्या बँक खात्यातून 1,49,999 इतकी रक्कम काढून टाकण्यात आली.
पैसे काढण्यात आल्यानंतर आफताबने बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधला तेव्हा त्याला तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. आता आफताबने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात 2 अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी आयपीसीच्या कलम 419 आणि 420 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (सी) आणि 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलीस या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत.
केवळ आफताब हाच ऑनलाईन फसवणुकीचा बळी ठरलेला नाही तर यापुर्वी अन्नू कपूरची सुद्धा 4.36 लाखांच्या फसवणुक झाली होती. बँक अधिकारी असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्याच्या नावाने त्याची फसवणूक करण्यात आली.
त्यानंतर कारवाई करत त्याला 3.08 लाख रुपयांची रक्कम परत करण्यात आली होती तर अभिनेता पुनीत इस्सरला देखील 13.76 लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शबाना आझमी आणि पायल रोहतगी यांचीही फसवणूक झाली आहे.
'मिस्टर इंडिया', 'आवारा पागल दीवाना', 'हंगामा', 'मस्ती' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचा काम केल्यानंतर आता आफताब मोठ्या पडद्यापासून दूर आहे. नीरज पांडेच्या 'स्पेशल ऑप्स 1.5 ' या सिरिजमध्ये तो शेवटचा दिसला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.