after butterfly film success madhura welankar said why audience not coming for marathi movie sakal
मनोरंजन

Madhura Welankar: मराठी चित्रपटांना प्रेक्षक का येत नाही? 'बटरफ्लाय'च्या यशानंतर अभिनेत्री स्पष्टच बोलली

नीलेश अडसूळ

कुठलीही मोठी कंपनी कुठलाही मोठा निर्माता कुठलाही स्टुडिओ पाठीशी नसताना, एक साधी सरळ सोपी गोष्ट अगदी साध्या सरळ पद्धतीने, मराठीचा स्वाद कायम ठेवून, सगळ्यांना आवडेल, अख्ख कुटुंब पाहू शकेल अशा पद्धतीचा सिनेमा जर तयार केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला तर प्रेक्षक प्रेक्षागृहात येतात. असा विश्वास अभिनेत्री मधुरा वेलाणकरने व्यक्त केला आहे.

कारण सर्व समीक्षकांनी सर्व प्रेक्षकांनी अनेक दिग्गज मंडळींनी कौतुक केलेला तिचा 'बटरफ्लाय' हा चित्रपट सलग तीन आठवडे घोडदौड करत आहे.

'प्रत्येक बाईने, प्रत्येक नवऱ्याने प्रत्येक कुटुंबाने पाहायलाच हवा असा हा चित्रपट, आजच्या धकाधकीमधे आणि भपकेबाज गोष्टीं चालू असताना हा चित्रपट तुम्हाला सुखावून जातो,' अशा विविध पद्धतीच्या सकारात्मक प्रतिक्रिया या चित्रपटाला मिळाल्या आणि मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज ती मराठी सिनेमावर बोलली आहे.

(after butterfly film success madhura welankar said why audience not coming for marathi movie)

मधुरा वेलणकर म्हणतात, ' मराठी चित्रपटांच्या गर्दीत इंग्रजी चित्रपटांच्या लाटेत आणि अतिशय मोठ्या अशा हिंदी चित्रपटांच्या तोडीला हा चित्रपट उभा राहिला. आज तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा पुण्यामध्ये ह्याचे हाउसफुल खेळ चालू आहेत ही पसंती प्रेक्षकांनीच या चित्रपटाला दिली.'

'आजही अनेकांना हा चित्रपट पाहायचा आहे. मराठी चित्रपटाचा प्रेक्षक हा माऊथ पब्लिसिटी वर म्हणजेच एकाने दुसऱ्याला सांगून वाढत जातो, या अशा पद्धतीने मराठीला चित्रपटगृह मिळणं ही फार महत्त्वाची बाब असते.'

पुढे मधुरा (madhura welankar) म्हणाली की, 'निदान महाराष्ट्रात तरी, जेव्हा मल्टिप्लेक्स म्हणतो तेव्हा अनेक स्क्रीन असतात त्यातली निदान एक स्क्रीन महाराष्ट्रातल्या मराठी सिनेमांसाठी राखीव असली पाहिजे, कारण कुठलाही मोठा चित्रपट हिंदी,इंग्रजी आला की मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही'

'मराठी प्रेक्षकांना पहाता येईल अशा वेळा उपलब्ध होत नाही. मराठीचा तिकीट दर हा कमी असतो आणि हिंदी इंग्रजीचा जास्त असतो त्यामुळे ही गत होते. परंतु प्रेक्षक येतात का तर येतात!!'

'चांगलं दाखवलं चांगलं केलं तर त्याची दखल घेतली जाते, हे आपल्याला ‘बटरफ्लाय‘ सारख्या चित्रपटाने पुन्हा एकदा दाखवून दिले. असेच उत्तम उत्तम चित्रपट मराठीत येवो आणि मराठीला थेएटर्स मिळो हेच मागणे.' अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhararvi News: धारावीमध्ये तणाव! मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड

Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

Pitru Paksha 2024 : तुमच्या कुंडलीतही आहे का पितृदोषाचे सावट?; या लक्षणांवरून ओळखा

नवरा माझा नवसाचा 2 Movie Review: कथा नवसाचीच फक्त पॅर्टन वेगळा!

REIT Investment: फक्त 140 रुपयांमध्ये करोडोंच्या मालमत्तेत गुंतवणूक करा; भाड्यातून होईल मोठी कमाई

SCROLL FOR NEXT