After ‘Lal Singh Chaddha’ and ‘Liger’, ‘Sholay’ is also on the target of Boycott gang, know what is the matter' Esakal
मनोरंजन

लाल सिंग चड्ढा नंतर आता 'बॉयकॉट शोले' ट्रेन्ड सुरू ; म्हणे,'७० च्या दशकातही..'

सोशल मीडियावर 'शोले' विषयी अपमानास्पद भाष्य केलं जात आहे.

प्रणाली मोरे

Boycott Sholey: बॉलीवूडची(Bollywood) सध्याची परिस्थिती वाईट आहे. एकीकडे प्रेक्षकांनी थिएटरकडे पाठ फिरवली आहे,तर दुसरीकडे सोशल मीडियावर सिनेमांना बॉयकॉटची(Boycott) मागणी केली जातेय. आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' आणि विजय देवरकोंडाच्या 'लाइगर' सिनेमा विरोधात सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेन्ड वादग्रस्त ठरला. दोघांच्याही सिनेमांनी बॉक्सऑफिसवर काहीच कमाल दाखवली नाही. आता या यादीत आइकॉनिक 'शोले' सिनेमा देखील सामिल आहे. सोशल मीडियावर 'शोले' विषयी अपमानास्पद भाष्य केलं जात आहे,आणि बोललं जात आहे की, ७० व्या दशकापासून बॉलीवूड हिंदूफोबिक म्हणजे हिदूंच्या विरोधात लोकांच्या मनात भीती आणि राग भरवण्याचा प्रयत्न करत आहे.(After ‘Lal Singh Chaddha’ and ‘Liger’, ‘Sholay’ is also on the target of Boycott gang, know what is the matter)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बॉलीवूडच्या विरोधात प्रचार सुरु झाला आहे. बॉलीवूडच्या सिनेमांवर आरोप केला जात आहे की आताच नाही तर ७०,८०,९० च्या दशकातही बॉलीवूड सिनेमांनी हिंदू धर्माची प्रतिमा डागाळली होती, आणि मुस्लिम धर्मीय व्यक्तिरेखांना चांगलं दाखवलं गेलं होतं. आणि यासाठी लोक सुपरहिट 'शोले' आणि 'सुहाग' सिनेमांची उदाहरणं देत आहेत. हे दोन सिनेमे आपल्या जमान्यातले सुपरहिट सिनेमे होते. शोले सिनेमाला सलीम-जावेद जोडीनं तर 'सुहाग' ला कादर खान यांनी लिहिलं होतं.

ट्वीटरवर काही लोक या दोन्ही सिनेमांची उदाहरणं देताना बोलत आहेत की,'शोले' मध्ये गावातील रहीम चाचा म्हणजेच इमाम साहबना भला माणूस म्हणून दाखवलं गेलं होतं. ही व्यक्तीरेखा एके हंगल यांनी साकारली होती. तर दुसरीकडे 'सुहाग' सिनेमात अमजद खान आणि अन्य कलाकारांना साधुंच्या वेशात दाखवलं गेलं आहे,ज्यांच्या व्यक्तीरेखा सिनेमात खलनायकाच्या आहेत. म्हणजेच सिनेमाच्या माध्यमातून साधूंचा देखील अपमान करण्यात आला होता. यासंदर्भातील काही ट्वीट्स इथे बातमीत आपण पाहू शकता.

आता फक्त पाहत राहायचं की या बॉयकॉट ट्रेन्डमध्ये कोणकोणत्या सिनेमांना ओढलं जात आहे. आता तरी परिस्थिती बिघडलेली दिसत आहे. कारण जो सिनेमा रिलीज होणार आहे त्याआधी सिनेमाच्या बॉयकॉटची मागणी केली जाताना दिसतेय. आता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाला सोशल मीडियावर विरोध होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: सकाळ माध्यमाच्या नावे व्हायरल होत असलेली 'सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा' ही पोस्ट खोटी

आई झालेल्या दीपिका पादुकोणची उडवली खिल्ली; मग लिहिली त्याहून वाईट कमेंट, नेटकऱ्यांचा संताप अनावर

WBBL, Video: कडक! स्मृती मानधानाने पळत येत घेतला अफलातून कॅच, Video होतोय व्हायरल

Pune Assembly Election 2024 : खा मटण, दाबा आमचे बटण; मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

Kelara Beach : हिवाळ्यात केरळ फिरायचं प्लॅन करत आहात का ? तर या ५ बीच ला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT