Hemangi Kavi On Ravindra Mahajani Death: कालचा दिवस मराठी मनोरंजन विश्वासाठी खुपच वाईट होता. काल मराठी इंडस्ट्रीने एक देखणा नट गमावला. जेष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं. तळेगाव दाभाडे येथील आंबी गावातील फ्लॅटमध्ये रवींद्र मृतावस्थेत आढळले.
दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकटेच राहत होते. काल पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोरंजन विश्वातील कलाकारांबरोबच अनेक राजकिय नेत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र सोशल मिडियावर कुठे तरी त्याच्या परिवाराबद्दल काही नकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्याच्या परिवाराने त्यांच्याशी संपर्कही साधला नसल्यानं महाजनी यांच्या परिवारावर आणि मुलावर नेटकरी टिका करत होते. आता नेटकऱ्यांच्या याच टिकेला अभिनेत्री हेमांगी कवी हिने एक पोस्ट शेयर करत उत्तर दिले आहे.
या पोस्टमध्ये हेमांगीनं नेटकऱ्यांनाच काही प्रश्न विचारले आहेत. ती या पोस्टमध्ये म्हणते की, आपण कोण झालो आहोत?
काल जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी गेल्याचं कळलं. अर्थात आधी सोशल मिडिया वरून नंतर न्यूज चॅनलमधून. पण ते गेल्याची पेक्षा ते ‘कसे’ गेले याचीच ‘बातमी’ सर्वत्र जास्त पसरली! जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे!
नक्कीच बातमी देणाऱ्यांची आता ती style च झालीए बातम्या अशाप्रकारे लोकांपर्यंत पोचवण्याची! त्याशिवाय लोकं बातमीच बघत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांचा दोष नाही, शेवटी प्रत्येकाला पोट आहेच.
पण त्या बातमीवर आलेल्या comments वाचून माणूसपणाची सिसारी आली. ते इतकं अंगावर आलं की श्रध्दांजली वाहणं नकोसं झालं! त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही ही माहीत नसताना वाट्टेल ते बोलत सुटले लोक! त्यांच्या मुलाबद्दल, पत्नीबद्दल! असं मरण अनेक लोकांना येत असावं पण केवळ ते अभिनेते होते, प्रसिद्ध होते म्हणून वाट्टेल ते बोलण्याचा परवाना घेतला आपण!'
पुढे ती म्हणते, 'ज्या Hero ला आपण लहानपणापासून पहात आलोय त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणं खुप Surreal वाटतं मला! ‘रंगीबेरंगी’ सिनेमात तुमच्या सोबत तुमच्या मुलीचं काम करण्याचं भाग्य मला लाभलं! रविंद्रजी जिथं कुठं आहात तिथं शांत असाल आणि आम्हांला माफ कराल अशी मी आशा करते!'
याच पोस्टमध्ये हेमांगीने गश्मीर महाजनीबद्दल देखील लिहिलं आहे. गश्मीरचा उल्लेख करत ती लिहिते की, गश्मीर महाजनी आधीच इतका struggle करून उभा आहेस, त्यात आता याची भर! Really very very sorry! And Strength to you, boy!'
याबरोबर तिनं नेटकऱ्यांना सल्लाही दिला आहे. ती म्हणते की, 'Yes, Social Media वर किंवा कुठेही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण जरा तार्तम्य ठेवलं तर नाही का चालणार? बातमी देणाऱ्यांना चेहरा नाही पण आपल्याला आहे! हे थोडं लक्षात ठेऊया! बास!'
हेमांगीही सोशल मीडियाच्या माध्यामातुन वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं रोखठोकपणे आणि बिनधास्तपणे सोशल मिडियावर मांडत असते. आता तिच्या या पोस्टची सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे. काही लोक तिला पाठिंबा देत आहेत तर काही तिच्यावर टिका करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.