अक्षय कुमारच्या OMG 2 सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली. OMG 2 सिनेमाने लैंगिक शिक्षण किती महत्वाचं आहे हा महत्वाचा संदेश दिला. अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी या कलाकारांचा हा सिनेम सर्व प्रेक्षकांना आवडला.
आता OMG 2 नंतर अक्षय कुमारच्या आणखी एका गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. स्वतः अभिनेते अनुपम खेर यांनी यासंबंधी इशारा दिलाय.
(after omg 2 akshay kumar popular movie sequel on floor)
अक्षय कुमारच्या या सिनेमाचा सिक्वेल येणार
2013 मध्ये अक्षय कुमारचा 'स्पेशल 26' हा चित्रपट आला होता. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मनोज बाजपेयी, जिमी शेरगिल, दिव्या दत्ता, किशोर कदम आणि इतर अनेक स्टार्स दिसले होते.
या चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी अनेक दिवसांपासून चाहते करत आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या माध्यमांशी संवाद साधताना अनुपम खेर यांनी त्याचा सिक्वेल बनवण्याचे संकेत दिले आहेत.
स्पेशल 26 च्या सिक्वेलसाठी दिग्दर्शक नीरज पांडेंकडे अनुपम खेरचा पाठपुरावा
स्पेशल 26 सिनेमात काम करणाऱ्या अनुपम खेर यांनी खुलासा केला की, "स्पेशल 26' च्या सिक्वेलशी संबंधित प्रश्न हा त्यांना अनेक वर्षांपासून नीरजला विचारायचा होता. पण मी जेव्हाही नीरजला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नीरज पांडे बोलणं टाळतो.
नीरज अनेकदा माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतो. स्पेशल 26'चा सीक्वेल बनवला गेला तर मलाही आवडजेल. मी स्वतः नीरज पांडेच्या मागे आहे."
त्याचा सिक्वेल होण्याची आशा व्यक्त केली
अनुपम खेर पुढे म्हणाले की, "नीरज पांडे त्याच्या वेब शोचे अनेक सीझन बनवत आहे. त्यांनी 'स्पेशल 26' चा सिक्वेल देखील बनवावा, कारण हा चित्रपट सिक्वेलला पात्र आहे. अनुपम खेर यांनी गमतीने सांगितले की, नीरज त्याच्या सिक्वेलबद्दल फारसा उत्सुक नाही. पण अभिनेता म्हणुन मी स्वत: खूप उत्साहित आहे आणि आशा करतो की लवकरच त्याचा सिक्वेल बनविला जाईल."
अशाप्रकारे अक्षय कुमारच्या OMG 2 नंतर आता स्पेशल 26 चा सिक्वेल आला तर आश्चर्य वाटायला नको.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.