after Prasad Oak said he give party to maharashtrachi hasyajatra team and they started dancing video viral sakal
मनोरंजन

Prasad Oak: ठरलं! अखेर प्रसाद ओक पार्टी देणार.. हास्यजत्रेच्या टीमनं डिजे लावून केला जल्लोष..

प्रसाद ओक 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमला पार्टी कधी देणार हा जवळपास उभ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे.

नीलेश अडसूळ

Prasad oak: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. गेल्या काही वर्षात या कार्यक्रमाने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. करोना काळात लोकांना हसवून त्यांचा तनाव कमी करण्याचे काम इथल्या सर्व विनोदवीरांनी केले. त्यामुळे या कार्यक्रमाने काही वर्षातच खूप मोठी ऊंची गाठली आहे.

या कार्यक्रमात समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, दत्तू मोरे, शिवाली परब असे अनेक कलाकार आपल्या विनोदातून आपल्याला हसवतात तर त्यांच्या स्किटचे परीक्षण अभिनेता प्रसाद ओक करतो.

गेल्या काही वर्षात प्रसादने प्रचंड प्रगती केली. त्याचे अनेक सिनेमे आले, ते हीटही झाले. पण या यशाची पार्टी काही त्याने दिली नाही अशी तक्रार सातत्याने हास्यजत्रेतील कलाकार करतात. नंतर त्यातून विनोद निर्मिती झाली आणि आता तर प्रसाद ओक पार्टी कधी देणार हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे.

(after Prasad Oak said he give party to maharashtrachi hasyajatra team and they started dancing video viral)

पण प्रसाद ओकने मात्र आता सर्व टीमला पार्टी द्यायचं ठरवलं आहे. नुकताच एक व्हिडिओ सोनी मराठीने सोशल मीडियावर शेयर केला आहे. ज्यामध्ये प्रसाद ओक खुर्चीत बसून म्हणतो.. ''एकदा बोललोना पार्टी देणार.. म्हणजे देणार'' आणि सगळी हास्यजत्रेची टीम नाचू लागते.

पण नंतर कॅमेरा पुढे येतो आणि प्रसाद हळूच म्हणतो, ''मी यांना पार्टी देणार नाही'' हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. खरतर प्रसादने 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या यशानंतर सर्वांना पार्टी दिली होती, पण सध्या प्रसादची पार्टी हा विनोदाचा विषय झाल्याने सर्वच त्याची मजा घेत असतात.

या पार्टी प्रकरणा विषयी एका मुलाखतीत प्रसाद म्हणाला होता, ''हिरकणी नंतर मी पार्टी देणार होतो. ज्या दिवशी शुटिंग असत त्याच्या आदल्या दिवशी रीहसलसाठी सगळे येतात त्याच दिवशी मी पार्टी द्यायची ठरवलं. पण नेमकं त्याच वेळी शुटिंग कॅन्सल झालं आणि तेव्हा पासून हे लोक माझी मज्जा घेत आहेत.”

''यानंतर चंद्रमुखीच काम सुरु झालं. मग करोना आला. लॉकडाऊन मध्ये कशी पार्टी देणार. पुढे मी दमनला शूट असताना पण पार्टीची व्यवस्था केली. पण चॅनेल हेड म्हणाले तु पार्टी दिली तर एपिसोड मधले पंचेसच संपतील. त्यामुळे लवकर पार्टी देऊच नकोस' असं हे पार्टी प्रकरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT