after watch leo trailer thalapathy vijay fans destroyed theatre seats in rohini thatre SAKAL
मनोरंजन

Leo Trailer: लिओ ट्रेलर पाहून विजयच्या फॅन्सनी केला राडा, थिएटरमध्ये खुर्च्यांची तोडफोड, व्हिडीओ आला समोर

लिओचा ट्रेलर पाहून विजयच्या फॅन्सनी थिएटरमध्ये एकच राडा केलाय

Devendra Jadhav

Leo Trailer News: लिओ ट्रेलर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला. थलापती विजयच्या फॅन्स सिनेमाच्या ट्रेलरची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर लिओचा ट्रेलर काल रिलीज झाला.

साऊथ सुपरस्टारचे फॅन्स त्यांच्या लाडक्या अभिनेत्यांसाठी किती दिवाने असतात याचा अनुभव नुकताच आलाय. लिओचा ट्रेलर पाहून विजयचे फॅन्सनी एवढा गोंधळ घातला की थिएटरमधल्या खुर्च्यांची नासधूस केली. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

(after watch leo trailer thalapathy vijay fans destroyed theatre seats)

एक व्हिडीओ समोर आलाय यात दिसतं की, चाहते बाहेर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात थिएटरच्या खुर्च्यांची तोडफोड झाली.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये थिएटर हॉलमध्ये अस्वच्छता पसरली होती आणि काही सीट फाटल्या होत्या. आदल्या दिवशी, चाहत्यांनी थिएटरमधील व्हिडिओ शेअर केले आणि सांगितले की लिओचा ट्रेलर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.

व्हिडिओमध्ये, थिएटरच्या बाहेर मोठा जमाव जमलेला दिसत होता, जो दरवाजा उघडण्याची वाट पाहत होता. काही चाहत्यांनी थिएटरच्या आतील व्हिडिओ देखील शेअर केले आहेत, ज्यात असे दिसून आले आहे की सिनेमागृह चाहत्यांनी खचाखच भरलेली आहे आणि विजयचा जयजयकार करत आहे.

विजय आणि लिओची एकच हवा

तमिळ चित्रपट विश्वामध्ये थलापती विजयच्या नावाची मोठी क्रेझ आहे. त्यानं गेल्या काही वर्षांपासून ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केल्याचेही दिसून आले आहे. लोकेश कनगराजनं दिग्दर्शित केलेला लिओ हा चित्रपट यावर्षीचा विजयचा सर्वाधिक उत्सुकता असलेला प्रोजेक्ट आहे. १९ ऑक्टोबर रोजी तो प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये संजय दत्त, त्रिशा, अर्जून सर्जा यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT