Agnihotri Said who thought poice protection will needed for the Hindu festival  Google
मनोरंजन

अग्निहोत्रींचं नवं वादग्रस्त ट्वीट; म्हणाले,'दुश्मन आसपास अन् हिंदू सण तोंडावर...'

विवेक अग्निहोत्रींनी ईस्ट लीसेस्टर पोलिसांच्या एका ट्वीटला रीट्वीट करत आपल्या मनातला राग बाहेर काढत थेट हिंदू-मुस्लिम वादाचा मुद्दा छेडला आहे.

प्रणाली मोरे

Vivek Agnihotri: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले पहायला मिळतात. कधी ते बॉलीवूड बॉयकॉटवर बोलतात तर कधी हिंदू-मुस्लीम वादावर. आता पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम वादाला छेडून ते लाइमलाइटमध्ये आले आहेत. शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी त्यांनी ईस्ट लीसेस्टर पोलिसांच्या एका ट्वीटला रीट्वीट करत आपल्या मनातला राग बाहेर काढला आहे.(Agnihotri Said who thought poice protection will needed for the Hindu festival)

त्याचं झालं असं की, भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यानंतर वातावरण थोडं तंग झालं होतं. त्यानंतर ईस्ट लीसेस्टर पोलिसांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात लिहिलं होतं की,''आम्हाला नेहमीप्रमाणेच आता नवरात्री आणि दिवाळीसाठी सज्ज व्हावं लागणार आहे. सगळ्याच समाजातील लोक त्यादिवसांत सेलिब्रेशन मूडमध्ये असतात त्यामुळे त्याकाळात मोठ्या संख्येनं पोलिस तैनात असतील''.

आता पोलिसांच्या याच ट्वीटला रीट्वीट करतअग्निहोत्रींनी लिहिलं आहे- ''कोणी विचार केला होता की एक दिवस असाही येईल की हिंदू समाजाला आपल्या सगळ्यात मोठ्या सणांना साजरं करण्यासाठी पोलिस सुरक्षेची मदत लागेल. हे फक्त एकाच गोष्टीकडे बोट दाखवत आहे की,दुश्मन आपल्या आजुबाजूलाच आहे, हिंदू सण तोंडावर आणि संकट समोर उभं ठाकलंय''.

थोडक्यात इथे सांगतो की लीसेस्टरमध्ये हिंदू मंदीरावर हल्ला झाला होता, ज्याची झळ बर्मिंगहम पर्यंत पोहोचली होती. भारतानं या घटनेची मोठी निंदा केली आहे. तसंच हा मुद्दा अधिकाऱ्यांसमोर उचलून धरला आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले आहेत की,''आम्ही या प्रकरणाची सर्वोतोपरे चौकशी युद्धपातळीवर करत आहोत. यासाठी ब्रिटनच्या संपर्कातही आमचा अधिकारी वर्ग आहे. पुढे होणाऱ्या हल्ल्यांना थांबवण्यासाठी आणि आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी राजकीय आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT