Ahsaas Channa: अहसास चन्ना(Ahsaas Channa) ही ओटीटी प्लॅटफॉर्मची सुपरस्टार आहे. कितीतरी युट्युब चॅनलसाठी तिनं सीरीज आणि शॉर्ट व्हिडीओजमध्ये काम केलं आहे. अहसासने सुश्मिता सेनसोबत २००५ मध्ये 'वास्तुशास्त्र' मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. अहसास त्यावेळी फक्त ५ वर्षांची होती. त्यानंतर तिने कितीतरी सिनेमात काम केलं. 'कभी अलविदा ना कहना','आर्यन', 'माय फ्रेंड गणेशा' अशा कितीतरी सिनेमांची तिच्या नावावर नोंद झाली आहे. पण प्रसिद्धिसोबत अहसासचं नाव अनेक वादांशी देखील जोडलं गेलं आहे.(Ahsaas Channa Controversy Sex Change Operation, Father Filed Case on Karan Johar)
अहसास आपला २२ वा वाढदिवस साजरा करत आहे. बातमी आहे की, एहसासचे आईवडील हे तिच्या लहानपणीच वेगळे झाले आहेत. अहसासचे वडील इकबाल सिंग चन्ना हे पंजाबी सिनेमांचे निर्माते आहेत. तर आई कुलबीर कौर ही एक टी.व्ही अभिनेत्री आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार,अहसासचे वडील इकबाल यांनी सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरवर देखील केस ठोकली होती.
इकबाल सिंग यांनी आरोप केला होता की,करण जोहरने त्यांना कुठलीही आगाऊ सूचना न देता त्यांच्या मुलीला न्यूयॉर्कला शूटसाठी नेले होते. अहसासने करण जोहरच्या कभी अलविदा ना कहना सिनेमात शाहरुखच्या मुलाची भूमिका साकारली होती. अहसासच्या वडीलांनी तेव्हा केस दाखल केली होती आणि आरोप लावला होता की त्यांच्या पत्नीवर बंधनं लादली जावीत कारण ती मुलीला वडीलांच्या परवानगीशिवाय परदेशात शूटिंगसाठी पाठवते.
अहसासच्या वडीलांनी तिच्या आईवर असाही आरोप केला होता की, ती आपल्या मुलीला पैसा कमावण्याची मशिन समजते. तिचं तिच्या अभ्यासावर मुळीच लक्ष नाही. त्यांनी ज्या शाळेत अहसास शिकत होती त्या जानकी देवी शाळेला देखील नोटीस पाठवली होती. वडीलांच्या परवानगीशिवाय शाळेनं अहसासला परदेशात जाण्यासाठी इतक्या दिवसांची सुट्टी कशी दिली? असा प्रश्न त्यावेळी त्यांनी उपस्थित केला होता. अहसासच्या वडीलांनी त्यावेळी म्हटलं होतं की त्यांची मुलगी आपला अभ्यासाचा मौलिक वेळ आईमुळे फुकट घालवत आहे, आणि स्वतःचे नुकसान करुन घेत आहे.
अहसासने लहानपणी फक्त मुलांच्या भूमिका केल्या. तिचं बोलणं आणि वेशभूषा हे सगळं लहानपणी मुलांसारखेच होते. तिच्या वडीलांनी आपल्या पत्नीवर म्हणजे अहसासच्या आईवर आरोप केले होते की,ती अहसासला मुलासारखं राहण्याची जबरदस्ती करते. मुद्दामहून ती तिच्यासाठी मुलांच्या भूमिका शोधून आणते आणि त्यासाठी तिला कपडे पण नेहमी तसेच घालते. अहसास संबंधित हा वाद खुप वर्ष सुरू होता,की ती मुलगी आहे की मुलगा. कितीतरी लोकांनी तिच्यावर आरोप केले होते की वयाच्या ६ व्या वर्षी तिनं सेक्स चेंजचं ऑपरेशन केलं होतं.
अहसासनं एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता की,लोकांना माझ्याविषयी गैरसमजूत होती की मी मुलगा होते, वयाच्या ६ व्या वर्षी मी सेक्स चेंजचे ऑपरेशन केले आणि मुलगी बनली असं देखील माझ्याबाबतीत बोललं गेलं. पण यात काही सत्यता नाही, मी मुलगीच होते आणि आहे. आपल्याविषयी चुकीच्या समजुती पसरायला लागल्या आहेत हे समोर येताच अहसासने लगेच मुलांच्या भूमिका साकारणं बंद केलं होतं. राम गोपाल वर्मा यांच्या वास्तुशास्त्र सिनेमातूनच अहसासने मुलाची भूमिका साकारायला सुरुवात केली होती. आण तिच्याविषयी चुकीची समजुत सर्वत्र पसरल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनीच तिला आपल्या फूंक सिनेमात मुलीची भूमिका साकारायला दिली होती. अहसासने यानंतर कधीच मुलाची भूमिका साकारली नाही. आणि आपल्याविषयी सुरु असलेल्या चुकीच्या समजुतींना तिनं कायमचा पूर्णविराम दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.