Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या रायने थकवला २२ हजारांचा टॅक्स, मिळाली नोटीस SAKAL
मनोरंजन

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या रायने थकवला २२ हजारांचा टॅक्स, मिळाली नोटीस

ऐश्वर्याला सिन्नर तहसीलदार कार्यालयाने नोटीस बजावली आहे.

Devendra Jadhav

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मोठ्या अडचणीत सापडली आहे. ऐश्वर्याला थकबाकीसंदर्भात एक नोटीस पाठवण्यात आली आहे. ऐश्वर्याला सिन्नर तहसीलदार कार्यालयाने नोटीस बजावली आहे. ऐश्वर्याने २२ हजारांचा टॅक्स थकवला आहे. त्यासंदर्भात तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

(aishwarya rai bachchan gets notice for not paying tax )

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील आडवाडी गावात पवन ऊर्जा कंपनीत ऐश्वर्याची गुंतवणूक आहे. आयकर बचत करण्यासाठी सुजलोन पवन ऊर्जा निर्मिती कंपनीत अनेक कलाकारांनी गुंतवणूक केल्या आहेत. ही कंपनी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या जमीनीवर आहे. सिन्नरमधील ठाणगावजवळ आडवाडी भागात ऐश्वर्याची सुमारे 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. याच जमिनीचं एक वर्षाचं कर ऐश्वर्याने थकवल्याची माहिती समोर येत आहे. ऐश्वर्यासोबतच इतरही 1200 मालमत्ता धारकांना कर थकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.थकबाकीदारांत बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रा. लि., मेटकोन इंडिया प्रा. लि., छोटाभाई जेठाभाई पटेल आणि कंपनी, राजस्थान गम प्रा. लिमिटेड, एल बी कुंजीर इंजिनिअर, एस. के. शिवराज, आयटीसी मराठा लिमिटेड, हॉटेल लीला व्हेंचर लिमिटेड, बलवीर रिसॉर्ट प्रा. लि., कुकरेजा डेव्हलपमेंट कार्पोरेशन, ओपी एंटरप्रायझेस कंपनी गुजरात, रामा हँडिक्राफ्ट, अल्ग्रो व्हेंचर्स लिमिटेड अशा कंपन्यांचा समावेश आहे.

ऐश्वर्या राय-बच्चन सह तालुक्यातील तब्बल १२०० अकृषक मालमत्ताधारकांना तहसीलदार एकनाथ बंगाळे यांच्या स्वाक्षरीनिशी थकबाकीच्या विवरणपत्रासह नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. अकृषक करापोटी सिन्नर तहसील कार्यालयाला १ कोटी ११ लाखांचा वार्षिक महसूल अपेक्षित आहे. त्यापैकी ६५ लाखांची रक्कम थकीत असून मार्च अखेर ती वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT