ajay devgn file image
मनोरंजन

मनोरंजन क्षेत्रातील कामगारांसाठी अजयने राबवली लसीकरण मोहीम

अजयच्या संस्थेने मुंबईमध्ये मनोरंजन क्षेत्रातील कामगार आणि मीडिया व्यावसायिकांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन केले.

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कोरोना काळात अनेक गरजू लोकांची मदत केली. नुकतेच बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगणच्या (ajay devgn) संस्थेने मुंबईमध्ये मनोरंजन क्षेत्रातील कामगार आणि मीडिया व्यावसायिकांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन केले. याबद्दल तरण आदर्श यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.(ajay devgn organizes vaccination camp in mumbai)

तरण आदर्श यांनी ट्विट करून लिहीले,'अजय देवगण यांनी मुंबईमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन केले. अजय देवगण यांच्या संस्थेने या लसीकरण शिबिराचे आयोजन 11 जुन 2021 रोजी आयोजित केले होते. हे शिबीर मनोरंजन क्षेत्रातील कामगार आणि मीडिया व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आले होते.' एप्रिल महिन्यामध्ये बीएमसी आणि हिंदुजा हॉस्पिटल यांच्यासोबत मिळून मुंबईकरांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी अजयने मदत केली होती. चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी, ​​करण जोहर आणि निर्माता महावीर जैन यांनी मनोरंजन क्षेत्रातील कामगारांसाठी विनाशुल्क लस मोहीम सुरू केली.

अजयने आणि बॉलिवूडमधील काही कलाकरांनी मुंबई महापालिकेसाठी दादरच्या शिवाजी पार्क येथील भारत स्काऊट आणि गाईडच्या हॉलमध्ये एक इमर्जन्सी युनिट स्थापन केले होते. भारत स्काऊट आणि गाईडच्या या हॉलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २० बेड लावले आहेत. तसेच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि पॅरा मॉनिटर्स या वैद्यकिय सुविधा देखील येथे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT