ajit pawar or devendra fadnavis who is better dcm here know supriya sule answer khupte tithe gupte SAKAL
मनोरंजन

Supriya Sule: कोण जास्त प्रभावी उपमुख्यमंत्री अजित पवार की देवेंद्र फडणवीस ? बघा सुप्रिया सुळेंनी काय दिलं उत्तर

खुपते तिथे गुप्ते शोमध्ये सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या

Devendra Jadhav

Supriya Sule News: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या खुपते तिथे गुप्ते शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. सध्या या शोचे अनेक प्रोमो आऊट होत आहेत.

सुप्रिया सुळे यांनी या शोमध्ये अनेक प्रश्नांना धारदार उत्तरं दिली. याशिवाय मनातल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अवधुत गुप्तेने सुप्रिया सुळेंना कोण जास्त प्रभावी अजित पवार की देवेंद्र फडणवीस? असा प्रश्न विचारला. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी काय उत्तर दिलं बघूया.

(ajit pawar or devendra fadnavis who is better dcm here know supriya sule answer khupte tithe gupte)

अजित पवार की देवेंद्र फडणवीस? सुप्रियाताईंनी कोणाला निवडलं

सुप्रिया सुळे यांचा खुपते तिथे गुप्ते मधील नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या प्रोमोत सुप्रियाताईंना अवधूत गुप्तेने प्रश्न विचारला की,"उपमुख्यमंत्री म्हणुन कोण जास्त प्रभावी अजित पवार की देवेंद्र फडणवीस?"

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या,"ऑफकोर्स अजित पवार" अशाप्रकारे सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार प्रभावी आहेत असं सांगितलं

आणि अजितदादांचा फोटो पाहून सुप्रियाताईंच्या डोळ्यात आलं पाणी

खुपते तिथे गुप्ते शो चा आणखी एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या प्रोमोत मंचावर सुप्रिया सुळेंची एन्ट्री होते. एकवेळ कुटुंबाताल माणसं साथ सोडतील, पण त्यांच्या आठवणी कधीच साथ सोडत नाहीत, अशी ओळ मागे ऐकायला येते. सुप्रिया सुळेंना अजितदादांचा फोटो दाखवण्यात येतो.

यावेळी दादांचा फोटो पाहून सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी येतं. हे बघून अवधूत गुप्ते म्हणतात, "तुम्ही कार्यक्रमाच्या आधी आम्हाला म्हणाला होता, की मी कोणासमोर भावना उघड करु शकत नाही. पण आता...!"

एकुणच अजितदादांनी बंड केल्यावर खुपते तिथे गुप्ते निमित्ताने सुप्रियाताई पहिल्यांदाच व्यक्त झालेल्या दिसल्या.

खुपते तिथे गुप्तेचा नवीन सीझन

खुपते तिथे गुप्तेचा नवीन सीझन काही महिन्यांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सीझनमध्ये आजवर अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. या सीझनची सुरुवात मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या हस्ते झाली.

यानंतर नितिन गडकरी, समीर वानखेडे, अभिजीत बिचुकले, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे, उर्मिला मातोंडकर, वंदना गुप्ते अशा अनेक राजकीय आणि कलाक्षेत्रातल्या व्यक्तींनी या सीझनमध्ये हजेरी लावली. सुप्रिया सुळे सहभागी असलेला हा खास एपिसोड १७ सप्टेंबरला रात्री ९ वाजता झी मराठीवर बघायला मिळेल

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT