Bhojpuri Actress Akanksha Dubey Suicide: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने रविवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आकांक्षानं अवघ्या २५ वर्षी तिचं आयूष्य संपवलं. तिच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे झाले आहेत.
तिच्या मृत्यूबाबत दोन मोठे अपडेट्स समोर आता समोर आले आहेत. आकांक्षा तिच्या मृत्यूच्या काही तास आधी इंस्टाग्रामवर लाईव्ह आली होती, त्यादरम्यान ती खुप रडत होती. आकांक्षा दुबेचा रडतानाचा व्हिडिओ चाहत्यांनी रेकॉर्ड केला आणि काही सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे असे सांगण्यात आले आहे की आत्महत्येच्या आदल्या रात्री आकांक्षाला तिच्या मृत्यूपूर्वी रात्री उशिरा सोडण्यासाठी एक व्यक्ती आला होता, जो तिच्या खोलीतही गेला होता. त्या मुलावर आता संशय बळावला जात आहे.
हा मुलगा आकांक्षाच्या खूप जवळ होता असेही सांगण्यात आले आहे. आता पोलिस कॉल डिटेल्सच्या मदतीने हत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा दुबे शनिवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीला जात असल्याचं सांगून हॉटेलमधून बाहेर पडली.
रात्री २ वाजण्याच्या सुमारास एक मुलगा आकांक्षाला ड्रॉप करण्यासाठी आला आणि तो तिला सोडण्यासाठी तिच्या खोलीत गेला.
मुलगा आकांक्षासोबत त्याच्या खोलीत जवळपास १७ मिनिटे थांबला होता आणि बाहेर आल्यानंतर आकांक्षाच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आता पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.
आकांक्षा दुबेला तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत दिसल्यावर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. त्यांनी भोजपुरी चित्रपट, संगीत आणि चित्रपटांमध्ये काम केले. आकांक्षा दुबेचे इंस्टाग्रामवर बरेच फॉलोअर्स आहेत आणि तिचे व्हिडिओ खूप लोकप्रिय झाले आहे.
तिने 'मेरी जंग मेरा फैसला'मधून इंडस्ट्रीत पदार्पण केले. 'मुझसे शादी करोगी' (भोजपुरी), 'वीरों के वीर' आणि 'फाइटर किंग' यासह अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली होती. आकांक्षाने आपल्या अभिनय कौशल्याने कमी वयातच इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.