akhil bharatiya marathi natya parishad president election bjp leader ashish shelar support prasad kambli and uday samant from prashant damle side sakal
मनोरंजन

Natya Parishad: नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गट विरुद्ध भाजप लढाई रंगणार? पवारांची भूमिका महत्वाची

आशीष शेलार आणि उदय सामंत आमाने-सामने

नीलेश अडसूळ

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली. आता येत्या १६ मे ला नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुक आणि इतर पदांसाठी निवडणुक होणार आहे. या निवडणुकीला आता चांगलाच राजकीय रंग चढत आहे.

प्रशांत दामले यांच्या पॅनलला उदय सामंत यांचा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानुसार दामले यांचे पॅनल पूर्ण ताकदीने रिंगणात उतरले आणि जिंकलेही पण आता अध्यक्ष कोण होणार हा मोठा पेच आहे.

कारण आपलं पॅनल मधून निवडून आलेले माजी नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी ही अध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे प्रसाद कांबळी यांनी भाजप नेते आशीष शेलार यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजप उतरल्याने ही निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे.

(akhil bharatiya marathi natya parishad president election bjp leader ashish shelar support prasad kambli and uday samant from prashant damle side)

नाट्यपरिषदेवर महाराष्ट्रभरातून निवडून आलेले ६० सदस्य अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. या निवडणुकीत प्रसाद कांबळींच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनल मैदानात आहेत तर दुसरीकडे प्रशांत दामलेही अध्यक्षपदाचे दावेकर आहेत. त्यामुळे प्रसाद कांबळी विरूध्द प्रशांत दामले अशी ही अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

मात्र जसजशी निवडणुक जवळ आली आहे तशी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीतही राजकारण रंगू लागलं आहे. प्रशांत दामलेंच्या पॅनल मध्ये निवणूक आलेले सदस्य विविध पक्षातले आहेत. तर अध्यक्ष पदासाठी दामलेंवर मंत्री उदय सामंत यांचा वरदहस्त असून ते या निवडणुकीसाठी पूर्णतः कंबर कसून आहेत. नुकतेच उदय सामंत यांनी याच निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि नाट्य परिषदेचे तहाहयात विश्वस्त शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सामंत यांनी प्रशांत दामले यांना अध्यक्ष करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

तर राजकीय रंग चढत असतानाच दुसरीकडे प्रसाद कांबळी यांना भाजप मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी प्रसाद कांबळी यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत होत असलेल्या या राजकारणाविषयी मुंबई भाजपचे अध्यक्ष व वरिष्ठ नेते आशिष शेलार यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने प्रसाद कांबळींना बोलवून या संपूर्ण निवडणूकीविषयी आणि होणाऱ्या चुकीच्या गोष्टींविषयी माहिती घेतली. आणि ते प्रसाद कांबळी यांच्या बाजूने उभे राहिले.

'मराठी रंगभूमी हा आपला एक सांस्कृतिक ठेवा आहे. आणि रंगभूमी आणि रंगकर्मींचा विकास होण्यासाठी राजकारणविरहीत वातावरण आणि चांगल्या माणसांची आवश्यकता असल्याने मी प्रसाद कांबळींना मराठी रंगभूमीचा एक चाहता म्हणून आपला पाठिंबा दर्शवतो आहे. भाजप हा पक्ष नेहमीच प्रत्येक गोष्टीत चांगल्या माणसांच्या पाठी नेहमीच भक्कम उभा राहतो त्यामुळे आपण प्रसाद कांबळी आणि त्याच्या पॅनलला साथ देत आहोत''अशी भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

प्रसाद कांबळींच्या मागे आशिष शेलार यांची साथ मिळाल्याने प्रसाद कांबळींचं आपलं पॅनलचं पारडं अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भक्कम झालं आहे . त्यामुळे ही निवडणूक आता भलतीच अटीतटीची झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT