Akhil Mishra 3 idiot actor Dies In An Accident at the age of 58  SAKAL
मनोरंजन

Akhil Mishra: धक्कादायक! बाल्कनीतून पडून 3 इडीयट्स मधील अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू

3 इडीयट्स मधील अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय

Devendra Jadhav

आमिर खान स्टारर 3 इडियट्समध्ये ग्रंथपाल दुबेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता अखिल मिश्रा यांचे अपघाती निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. अभिनेत्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अखिल त्याच्या स्वयंपाकघरात काम करत होता आणि घसरला. अखिल स्वयंपाकघरात जमिनीवर जखमी अवस्थेत सापडला आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

अखिलच्या पश्चात त्याची पत्नी सुझान बर्नर्ट आहे, जी जर्मन अभिनेत्री आहे. अखिलने अखेरचा श्वास घेतला तेव्हा ती हैदराबादमध्ये होती.

(Akhil Mishra Dies In An Accident at the age of 58 3 idiot actor)

अखिल यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाहीय. सूत्रांच्या माहितीनुसार काही जणांचं मत आहे की, स्वयंपाकघरात काम करत असताना पाय घसरुन त्यांचा मृत्यू झालाय.

तर काहीजणांचं म्हणणं आहे की बाल्कनीमध्ये काम करताना उंच बिल्डिंगवरुन खाली कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांची बायको सुझान या घटनेच्या वेळी हैद्राबादमध्ये शूटींग करत होती.

अखिलने उतरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, हातिम आणि इतर सारख्या अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केलंय. गेल्या काही वर्षांत अखिल डॉन, गांधी, माय फादर, शिखर, कमला की मौत, वेल डन अब्बा यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसला. अखिलला 3 इडीयट्समधील लायब्ररीयन दुबेच्या भुमिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली.

काही दिवसांपूर्वीच सुझानने एका मुलाखतीत सांगितले होते की, अखिलने तिला 'शुध्द हिंदी' शिकण्यास मदत करण्यासाठी आपले करिअर थांबवले आहे. अखिल आणि सुझान यांनी सप्टेंबर 2011 मध्ये पारंपारिक समारंभात लग्न केलेय याशिवाय त्यांनी मेरा दिल दिवाना या टीव्ही मालिकेत एकत्र काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT