akshay bhalerao post shared by maharashtrachi hasyajatra shramesh betkar  SAKAL
मनोरंजन

Akshay Bhalerao: चपाती बरोबर जात का खात नाही? अक्षय भालेराव प्रकरणावर हास्यजत्रेच्या कलाकाराची जळजळीत पोस्ट

हास्यजत्रेतील प्रमुख कलाकार श्रमेश बेटकरने अक्षय भालेराव प्रकरणावर जळजळीत पोस्ट लिहिलीय

Devendra Jadhav

Akshay Bhalerao Post by Shramesh Betkar News: महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा शो बंद असला तरीही सर्व कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत.

हास्यजत्रेचे कलाकार जितके प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास तत्पर असतात तितके ते सामाजिक भान सुद्धा जपत असतात.

अशातच हास्यजत्रेतील प्रमुख कलाकार श्रमेश बेटकरने अक्षय भालेराव प्रकरणावर जळजळीत पोस्ट लिहिलीय.

नांदेड मधील बोनडार गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून निर्दोष भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याच प्रकरणावर श्रमेशने बोट ठेवलं आहे.

(akshay bhalerao post shared by maharashtrachi hasyajatra shramesh betkar)

श्रमेश लिहितो... "अक्षय भालेराव असू दे किंवा जातीय द्वेषातून कुणाही व्यक्तीची हत्या झाल्यानंतर , जात जिंकली असं वाटणाऱ्या लोकांनी कृपया इकडे लक्ष द्या .

मेंदू अजून अश्मयुगातली गुहा साफ करत असला तरी आता आपण कॅलेंडर नुसार २१ व्या शतकात आलो आहोत .

बरं आपला जन्म आई वडिलांच्या कृपेने झाला त्यामुळे त्यात आपलं काही कर्तृत्व नाही, जो ऑक्सिजन आपण घेतोय तो आपण बनवलेला नाही.

श्रमेश पुढे लिहितो... "कोपऱ्यातल्या भिंतीवर सुसु करण्यात , रस्त्यावर थुंकण्यात , आई बहिणी वरून शिव्या देण्यात , आणि मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आपलं अर्ध आयुष्य जातं .

सुई नेलकटर पासून ते अगदी फॅन , एसी , फ्रिज , कार , मोटार , बाईक , विमान , वाशिंग मशीन , एवढंच काय ज्ञानांचं नवीन मशीन झालेला मोबाइल सुद्धा आपण बनवलेला नाही .

मग दुसऱ्याने बनवलेल्या सुईच्या भोकात फक्त दोरा घालण्याची आपली पात्रता असताना आपण आपल्या अस्तित्वाचा माज का करावा ? ते पण जातीवरून ? .

श्रमेश पुढे सांगतो की.. जात जर एवढी पावरफुल आहे मग भूक लागली की आपण चपाती बरोबर जात का खात नाही ? गाडीत पेट्रोल ऐवजी जात का टाकत नाही ?

का आपल्या पात्रतेची धाव कुंपणापर्यंतच आहे कळण्याची भीती वाटते ? कोरोना झाल्यावर लसी ऐवजी आपण जात का टोचली नाही ? एका मायक्रो मॅकरो साईज विषाणूने आपली पळता भुई थोडी केली होती ,

अस्पृश्य केलं होतं आपल्याला तरीही आपला माज अजून उतरला नाही . बरं अडी नडीला ही जात बँकेत ठेवली तर लोन पण मिळणार नाही म्हणजे किंमत शून्यच नाही का ? पण आपल्याला हे समजू शकत नाही कारण उत्क्रांती नावाची अवदसा आपल्याला शिवली नाही .

श्रमेश शेवटी सांगतो... "कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो आणि तो कुत्रा म्हणून जगतो , साप साप म्हणून जगतो , पक्षी पक्षी म्हणून जगतात , सगळेजणं आप आपला रोल नीट निभावत असताना आपण का माती खातो ?.

माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जगायचंय .. सोप्प आहे . प्रयत्न करायचा आहे . थोडं कठीण जाईल कारण पुस्तकांशी , तत्वाशी , सात्विक विचारांशी असा संबंध येत नाही पण ठीक आहे उम्मीद पे दुनिया कायम है"

अशी जळजळीत पोस्ट श्रमेशने लिहिलीय. हास्यजत्रेचे लेखक - दिग्दर्शक सचिन गोस्वामी, याशिवाय अनेक कलाकारांनी ही पोस्ट शेअर केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT