मुंबई : देशात होणाऱ्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याऱ्या भारतीय सैन्य दलांच्या (Indian Military) शोर्यगाथा सिनेमाच्या माध्यमातून पाहण्यासाठी देशभक्तांचा कल अधिक असतो. जवानांच्या जिगरबाज कामगिरीचे अनेक पैलु पडद्यावर झळकवण्यासाठी सिनेदिग्दर्शक सिनेमा अर्थपूर्ण बनविण्याकडे लक्ष केंद्रीत करतात. गुजरातमध्ये 2002 ला गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ''स्टेट ऑफ सिज: अक्षरधाम'' सिनेमा ( State of Siege Temple Attack movie) 9 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षरधाम मंदिरात दहशतवादी हल्ल्यात ( Gujrat Terrorist Attack) जखमी झालेल्या,मृत्यू पावलेल्या आणि देशातील सैनिकांचा सन्मान करण्यासाठी या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाचा पहिला टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) स्टारर ''स्टेट ऑफ सिज: अक्षरधाम'' सिनेमाचं प्रदर्शन 'झी5' च्या ओटीटीद्वारे करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अक्षय खन्ना या सिनेमात देशातील अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा जवानाच्या भूमिकेत झळकणार आहे. (Akshay Khanna plays NSG Commando in State of Siege Temple Attack movie )
गुजरातच्य़ा अक्षरधाम मंदिरात (Akshardham Temple) झालेल्या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांना NSG च्या जवानांनी कंठस्नान घातले होते. त्यावेळी जवानांकडून कशा प्रकारे दहशतवाद विरोधी कारवाया केल्या गेल्या,यावर आधारीत हा सिनेमा आहे. त्यामुळे देशाच्या जवानांचे शोर्य पडद्यावर पाहण्यासाठी देशभक्तांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केन.घोष यांनी केलं आहे.
अक्षय खन्ना NSG कमांडोच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला
डिजीटल माध्यमात पदार्पण करणाऱ्या अक्षय खन्ना यांची ''स्टेट ऑफ सिज: अक्षरधाम'' सिनेमात NSG कंमाडोची भूमिका पाहणे प्रेक्षकांना औत्सुक्याचे ठरणार आहे. "गुजरातच्या अक्षरधाम मंदीरावर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यापासून यात्रेकरुंचा बचाव करण्यासाठी अक्षयने एका जिगरबाज NSG जवानाची भूमिका साकारली आहे. मंदीरावर होणाऱ्या हल्ल्यापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक बचावकार्य मोहिम राबविण्य़ात आली आहे. चार दहशतवादी ट्रेनने प्रवास करत अक्षरधाम मंदीराच्या दिशेनं कूच करतात. त्यावेळी त्यांनी ठरवलेल्या रणनितीनुसार मंदीर परिसरात असणाऱ्या यात्रेकरुंवर हे दहशतवादी बेछुट गोळ्या झाडतात. त्यानंतर हे दहशतवादी काही यात्रेकरुंना ओलीस करुन ठेवतात. त्यामुळं ओलीस ठेवलेल्या यात्रेकरुंची दहशतवाद्यांपासून सुखरुप सुटका करण्यासाठी अशा अतिरेकी कारवायांचा तातडीने खात्मा करणं का महत्वाचं असतं, तसंच अशा कारवायांमध्ये देशाचे जवान निधड्या छातीने दहशतवाद्यांचा खात्मा कसे करतात," जवानांच्या अशा शोर्यगाथेचं सुंदर सादरीकरण या टीझर मध्ये करण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.