Akshay Kumar Bollywood Actor covid 19 lockdown
Akshay Kumar Bollywood Actor covid 19 lockdown  esakal
मनोरंजन

Akshay Kumar : दोन वर्षांत एक डझन चित्रपट फ्लॉप झाले, फक्त 2 चित्रपटांनी अक्षयला दिला आधार!

युगंधर ताजणे

Akshay Kumar starrer in a dozen films after after covid 19 lockdown : बॉलीवूडचा खिलाडी म्हणून अक्षय कुमारची क्रेझ गेल्या तीन दशकांपासून कायम आहे. त्यानं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय हा त्याच्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात यंदाचे वर्ष त्याच्यासाठी खूपच निराशाजनक चालले असल्याचे बोलले जात आहे.

खरं तर गेल्या दोन वर्षांपासून अक्षय कुमारचे जेवढे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत त्यांना प्रेक्षकांनी नाकारल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात अक्षयनं ज्या वेगानं चित्रपट त्यानं चित्रपट प्रदर्शित केले त्याच वेगानं ते चित्रपट निघून गेल्याचेही प्रेक्षकांनी पाहिले. सध्या त्याचा मिशन रानीगंज नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही.

Also Read - लहान मुलांनी अस्थिर, चंचल असणं हे ADHD चे लक्षण आहे का?

त्यापूर्वी अक्षयचा बहुचर्चित असा ओएमजी २ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात पंकज त्रिपाठी, यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याला कारण त्या चित्रपटासमोर सनी देओलच्या गदर २ चे मोठे आव्हान देखील होते. अशातच अक्षयच्या सम्राट पृथ्वीराज, बच्चन पांडे, रामसेतू, नावाच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारल्याचे दिसून आले आहे.

बॉक्स ऑफिसच्या माहितीनुसार, अक्षयचे गेल्या दोन वर्षात जेवढे चित्रपट प्रदर्शित झाले त्यात निवडक काहीच चित्रपटांना प्रेक्षकांनी स्विकारल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये कोरोनामुळे थिएटर्स बंद असल्यानं ओटीटीवर अक्षयचे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यात लक्ष्मी बॉम्ब आणि कटपुतली नावाच्या चित्रपटांचा उल्लेख करता येईल. त्याला जेमतेम यश मिळाले.पण म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये अक्षयच्या चित्रपटांनी ७५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. २०१५ मध्ये बॉलीवूडच्या ज्या सेलिब्रेटींच्या चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली त्यामध्ये शाहरुख खानच्या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल.

अक्षय हा आता स्वत निर्मात्यांच्या भूमिकेत गेला आहे. त्यामुळे त्याला बॉक्स ऑफिसचे गणितही माहिती झाले आहे. त्यानं काही दिवसांपासून ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या कंटेटवर अधिक भर दिल्याचे दिसून आले आहे. अक्षयच्या मिशन रानीगंज विषयी बोलायचे झाल्यास त्यानं आतापर्यत फक्त पावणे तीन कोटींची कमाई केली आहे. मागील तीन दिवसांत या चित्रपटानं केवळ साडेबारा कोटींची कमाई केली आहे.

लॉकडाऊननंतर अक्षयच्या केवळ बेलबॉटम या चित्रपटानं जास्त कमाई केल्याचे दिलून आले होते. २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी परिस्थिती अशी होती की, कुणीही चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नव्हते. मात्र अक्षयनं ते धाडस दाखवले होते. त्याला समाधानकारक प्रतिसाद मिळाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

Suyash Tilak :  ‘मुलांच्या हातात मोबाईल देताय तर, किमान इतकं करा’ सुयश टिळकचा पालकांना सल्ला

Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra News Updates : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT