Akshay Kumar Played Shivaji Maharaj role: प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मोठया उत्साहात पार पडला होता. त्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. वेगवेगळ्या कारणास्तव हा चित्रपट चर्चेत आला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं साकारली आहे.
अक्षय कुमारनं आज सोशल मीडियावर शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील लूक शेयर केला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तो लूक पाहताच त्याला नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओवरुन त्याला काही जणांनी ट्रोल केले आहे. आता तर ट्विटरवर अक्षय कुमार ट्रेडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे. त्याचे कारणही चत्मकारिक आहे. ते काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
पुढील वर्षी मांजरेकर यांचा वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी आपण पाच वर्षांहून अधिक काळ थांबल्याचे मांजरेकर यांनी त्या मुहूर्तसोहळ्यात सांगितले होते. दरम्यान चित्रपटातील सात मावळ्यांच्या नावापासून ते शिवाजी महाराज यांची भूमिका करणाऱ्या अक्षय कुमारपर्यत अनेक विषयांवर वादाला सुरुवात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हा चित्रपट चित्रिकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आताही एका वेगळ्याच कारणामुळे त्यानं पुन्हा लक्ष वेधून घेतले आहे.
त्याचे झाले असे की, अक्षयनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभूषेतील फोटो शेयर केला खरा. मात्र त्या व्हिडिओमध्ये राजदरबारातील प्रकाशयोजना ही काही नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे. खासकरुन त्या व्हिडिओमध्ये दिसणारे ते झुंबर लाईटनं चमकताना दिसते आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल केले आहे. काहींनी शिवाजी महाराज यांनी सोळाव्या शतकात राज्य केले. आणि एडिसननं अठराव्या शतकात लाईटचा शोध लावला. आणि आता अक्षयनं महाराजांची भूमिका केली आहे. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.