Akshay Kumar in Karan Johar’s C. Sankaran Nair biopic? Who is C.Sankaran? Google
मनोरंजन

कोण आहेत सी.शंकरन नायर, ज्यांच्या बायोपिक मध्ये दिसणार अक्षय कुमार

करण जोहरचे प्रॉडक्शन हाऊस सी शंकरन नायर यांच्यावर बायोपिक करण्याच्या हेतूने लवकरच कामाला सुरुवात करणार आहे अशी चर्चा इंडस्ट्रीत सुरू आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा(Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' ३ जून रोजी प्रदर्शित झाला पण अगदी दोनच दिवसांत या सिनेमावर फ्लॉप चा शिक्का बसला आहे. आता अक्षय अनन्या पांडेसोबत आणखी एका दुसऱ्या बायोपीकमध्ये काम करणार आहे अशी बातमी आहे. दावा केला जात आहे की,करण जोहरचे प्रॉडक्शन हाऊस सी शंकरन नायर यांच्यावर बायोपिक(Biopic) करण्याच्या हेतूने लवकरच कामाला सुरुवात करणार आहे. सध्या करण जोहर(Karan Johar) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

एका न्यूज पोर्टलने दावा केला आहे की,अक्षय कुमार आणि अनन्या पांडे(Ananya Panday) या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात अक्षय कुमार एका मोठ्या वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे तर अनन्या पांडे त्याच्या हाताखाली शिकणाऱ्या ज्युनियर वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप अनन्याला सिनेमासाठी साइन केलेलं नाही असं बोललं जात आहे. पण या भूमिकेसाठी अनन्याची निवड मात्र निश्चित केलेली आहे. जर सगळं नीट जुळून आलं म्हणजे या बातमीत तथ्य असेल कर अक्षय-अनन्या ही नवी जोडी पडद्यावर एकत्र काम करताना पहायला मिळेल. या सिनेमाचं टायटलही निश्चित करण्यात आलं आहे. मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार,या सिनेमाचं नाव 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर' असं असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन करण सिंग करणार आहे.

सी.शंकरन नायरचा जन्म ११ जुलै,१८५७ रोजी केरळमध्ये पालक्कड मध्ये झाला. ते व्यवसायानं वकील होते. मद्रास हायकोर्टात ते सुरुवातीला वकील होते आणि पुढे जज म्हणून त्यांनी कार्यकाळ गाजवला. बोललं जातं की ते असत्याच्या विरोधात ठामपणे उभे रहायचे. सत्यासाठी कोणाशीही वकीली अंदाजात दोन हात करण्यास त्यांची तयारी असायची. १८९७ मध्ये शंकरन इंडियन नॅशनल कॉंग्रेसशी जोडले गेले होते. खूप कमी वयात बनलेले मल्याळम प्रेसिडेंट म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध झालं. शंकरन यांनी इंग्रजी हुकमतीचा कडाडून विरोध केला होता. आणि काही गोष्टी पटल्या नाहीत तेव्हा थेट इंडियन नॅशनल कॉंग्रेस पदाचा त्यागही केला होता. शंकरन नायर यांनी जालियनवाला बाग आणि गव्हर्नर जनरल ओ ड्वायर यांचा देखील कडाडून विरोध केला होता. यासंदर्भात खूप मोठी केस देखील चालली होती,ज्यामध्ये नायर यांना हार पत्करावी लागली होती. आणि त्यानंतर त्यांना ५०० पॉन्डचा दंड देखील बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT