akshay kumar mission raniganj movie flop due to low response of audience SAKAL
मनोरंजन

Mission Raniganj: कितीही ऑफर दिल्या तरी प्रेक्षक येईना! मिशन रानीगंज सिनेमावर फ्लॉपचा शिक्का

अक्षय कुमारचा मिशन रानीगंज सिनेमावर फ्लॉपचा शिक्का बसल्याची शक्यता आहे

Devendra Jadhav

Mission Raniganj Movie News: मिशन रानीगंज सिनेमा काही दिवसांपुर्वी रिलीज झाला. सिनेमा रिलीज होऊन आता आठवडा होईल. पण सिनेमा कमाईत अपयशी ठरतोय.

मिशन रानीगंज सिनेमाचं कथानक आणि इतर गोष्टी पाहता सिनेमा बॉक्स ऑफीस चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. पण सिनेमाने प्रेक्षकांची सपशेल निराशा केलीय

अनेक ऑफर देऊनही मिशन रानीगंज फ्लॉप

मिशन रानीगंज सिनेमासाठी अनेक ऑफर देण्यात आल्या होत्या. अगदी एकावर एक तिकीट फ्री ही ऑफर देण्यात आली, याशिवाय उद्या नॅशनल सिनेमा डे निमित्ताने अनेक ठिकाणी सिनेमाचं तिकीट १०० रुपयांपेक्षा कमी आहे.

असं असलं तरी, अक्षयच्या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीय. मिशन रानीगंज सिनेमाने फक्त आजवर १८ कोटींची कमाई केलीय. त्यामुळे अक्षयच्या सिनेकारकीर्दीत मिशन रानीगंज एक फ्लॉप सिनेमा म्हणून ओळखलं जातोय.

मिशन राणीगंज सिनेमाची कथा?

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘मिशन रानीगंज’ ही खऱ्या आयुष्यातील नायक जसवंत गिलची कथा आहे. अक्षय कुमारने चित्रपटात जसवंत गिलची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील कोळसा खाणीत 65 खाण कामगार अडकल्याच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. अक्षय कुमार अभिनीत पात्र जसवंत सिंग गिल सर्व 65 खाण कामगारांचे प्राण वाचवते. या घटनेनंतर जसवंत सिंग गिल हे 'कॅप्सूल गिल' म्हणून ओळखले जाऊ लागले.

पायरेटेड साईट्सवर लीक झाल्याने मोठा फटका

मिशन रानीगंज सिनेमा फ्लॉप झालाय आणि अशातच सिनेमा ऑनलाईन लीक झालाय. अक्षय कुमारच्या 'मिशन रानीगंज' या चित्रपटापूर्वी या पायरेटेड साइट्सवर 'चंद्रमुखी 2', 'फुक्रे 3', 'द वॅक्सीन' वॉरसह अनेक चित्रपट लीक झाले आहेत.

पायरेटेड साइट्सवर चित्रपट लीक झाल्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होतो. या पायरेटेड साइट्सनी अनेक चित्रपटांच्या कलेक्शनचं नुकसान केलं आहे. मिशन रानीगंज सुरुवातीपासूनच अपेक्षित कमाई करण्यास अपयशी ठरत आहे. अशातच ऑनलाईन लीक झाल्याने सिनेमाला मोठा फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT