Suryavanshi and Bell Bottom esakal
मनोरंजन

सूर्यवंशी, बेल बॉटम एकाच दिवशी रिलीज होणार? अक्षय म्हणाला...

काही नेटकऱ्यांनी सूर्यवंशी आणि बेल बॉटम हे चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहेत, असे सोशल मीडियामध्ये घोषितही करून टाकलं आहे.

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Suryavanshi) आणि बेल बॉटम (Bell Bottom) या चित्रपटांची प्रतीक्षा त्याचे चाहते गेली कित्येक दिवस करत आहेत. या दोन्ही चित्रपटांबाबत सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. अशातच काही नेटकऱ्यांनी सूर्यवंशी आणि बेल बॉटम हे चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहेत, असे सोशल मीडियामध्ये घोषितही करून टाकलं आहे, पण स्वत: अक्षयने ही अफवा आहे, असे स्पष्ट केलं आहे. (Akshay kumar movie Suryavanshi and Bell Bottom will not be released on Independence Day)

एका मुलाखतीमध्ये अक्षयने सांगितले की, ‘सूर्यवंशी आणि बेल बॉटम या चित्रपटाबाबत चाहत्यांच्या उत्साह पाहून मी आनंदीत आहे. त्यांच्या या प्रेमासाठी मी त्यांचा ऋणी आहे. मात्र, हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आणि केवळ अफवा आहेत. दोन्ही चित्रपटांचे निर्माते रिलीज डेटबाबत काम करत आहेत. योग्य वेळ आल्यावर दोन्ही चित्रपटांची रिलीज डेट जाहीर केली जाईल.’

अक्षयचा सूर्यवंशी चित्रपट 2020 मध्ये ईद दरम्यान रिलीज होणार होता. मात्र, कोरोनामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यानंतर यंदा 30 एप्रिल रोजी सूर्यवंशी रिलीज होईल, असं सांगण्यात आलं होतं, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा ती पुढे ढकलली गेली आहे. अक्षयच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. सप्टेंबर 1981 ते ऑगस्ट 1984 मध्ये झालेल्या विमान हायजॅकिंगवर या चित्रपटाचे कथानक लिहले गेले आहे. या चित्रपटामध्ये लारा दत्ता, वाणी आणि अक्षय प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

मनोरंजन विश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT