Akshay Kumar Pankaj Tripathi Starrer OMG 2 OTT Release Esakal
मनोरंजन

OMG 2 OTT Release: अक्षयचा 'ओएमजी 2' OTT वरही गाजणार! जाणुन घ्या कुठे आणि केव्हा येईल पाहता..

Vaishali Patil

Akshay Kumar Pankaj Tripathi Starrer OMG 2 OTT Release: अक्षय कुमारचा OMG 2 हा सिनेमा 11 ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने सनी देओलच्या ब्लॉकबस्टर गदर 2 ला चांगलीच टक्कर दिली होती. मात्र यात गदर 2 ने बाजी मारली. तर अक्षयच्या OMG 2 ने देखील चांगली कमाई केली होती.

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा OMG 2 चित्रपट OTT वर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. एक मनोरंजक चित्रपटाबरोबरच सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे आता ज्या प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिला नसेल त्यांना आता घरबसल्या हा सिनेमा पाहता येणार आहे.

गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर विजय मिळवला असला तरी OMG 2 देखील मागे राहिले नाही. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांचेही प्रेम मिळाले. आता OMG 2 OTT वर रिलीज होणार आहे.

आता अक्षयचा OMG 2 हा चित्रपट नेटफ्लिक्सवर या प्लॅटफॉर्म प्रसारित करण्यात येणार आहे. या OTT प्लॅटफॉर्मने या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा केली आहे. तर , OMG 2 हा चित्रपट 8 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.

लैंगिक शिक्षणावर आधारित या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय पंकज त्रिपाठी, यामी गौतम, गोविंद नामदेव, अरुण गोविल असे अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए प्रमाणपत्र दिले आहे.

अक्षय कुमार या चित्रपटात यावेळी भगवान महादेवाच्या रूपात दिसत आहे. तर OMG 2 च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमवला होता तर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 150 कोटी रुपये जमवले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashra Vidhansabha Election : मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी का? मतदारांमध्ये आहेत मतभेद?

Surbhi Jyoti : कुबूल है फेम सुरभी ज्योती अडकणार विवाहबंधनात ; 'या' ठिकाणी पार पडणार शाही विवाहसोहळा

IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरला संघात का घेतलं? ऋषभ पंतची दुखापत अन् KL Rahulचे स्थान... टीम इंडियाच्या कोचने दिले अपडेट्स

Latest Maharashtra News Updates Live : भाजप आमदार राहुल कुल राष्ट्रवादी कार्यालयात दाखल

Maharashra Vidhansabha Election : कोणते सरकार चांगले वाटते? ठाकरे की शिंदे सरकार?

SCROLL FOR NEXT