Akshay Kumar on Manipur Incident News: मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसतोय. कारण गेल्या दोन-अडीच महिन्यांपासुन जातीय दंगली उसळल्यानंतर आता नुकतीच माणुसकीला लाज आणणारी घटना समोर आल्याने सर्वांना धक्का बसलाय.
याशिवाय काही महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
अशातच बॉलीवुडचा सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारने मणिपूरमधील या दुर्दैवी घटनेबद्दल संताप व्यक्त केलाय.
(Akshay Kumar REACTS 1st Time To Manipur Violence, Says 'Disgusted, Shaken To See Video)
मणिपूर दुर्घटनेबद्दल काय म्हणाला अक्षय कुमार?
20 जुलै रोजी सकाळी अधिकृत ट्विटर हँडलवर घडलेल्या घटनेचा संदर्भ देत अक्षय कुमार म्हणाला, "मणिपूरमधील महिलांवरील हिंसाचाराचा व्हिडिओ पाहून धक्का बसला, तिरस्कार वाटला.
मला आशा आहे की दोषींना इतकी कठोर शिक्षा होईल की कोणीही पुन्हा असे घृणास्पद कृत्य करण्याचा विचार करणार नाही." असं अक्षय म्हणाला
मणिपूर दुर्दैवी घटना नेमकी काय?
मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी हा प्रकार घडला असून याचे व्हिडिओ गुरुवारी आयटीएलएफच्या आंदोलनादरम्यान व्हायरल करण्यात आले.
यामध्ये काही पुरुष हे दुसऱ्या आदिवासी समाजातील दोन असहाय्य महिलांना विवस्त्र करुन त्यांच्या शरिराला स्पर्श करत होते,
याद्वारे त्यांचा विनयभंग करत असल्याचा दावा इंडिया टुडेनं आपल्या वृत्तामध्ये केला आहे. या महिलांवर सामुहिक अत्याचार करत त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचं टाइम्स नाऊनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
अक्षय कुमारचं वर्कफ्रंट
बॉलिवूड स्टार अक्षय कुमार हा सध्या त्याच्या OMG 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र गेले काही वर्ष अक्षयसाठी खुपच वाईट ठरले आहे. त्याचे सलग पाच ते सहा चित्रपट फ्लॉप गेले आहेत. त्यामुळे अक्षयवर फ्लॉप हा टॅग बसला आहे.
याचाच परिणाम असा की, गेल्या एका वर्षात अक्षयने थिएटरमध्ये 5 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. काही महिन्यांपुर्वी अक्षयचा सेल्फी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता मात्र तो देखील बॉक्स ऑफिसवर आपटला.
सूर्यवंशी, बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, कठपुतली, राम सेतू हे सर्व अक्षयचे फ्लॉप सिनेमे आहेत, जे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे बजेटही पुर्ण करु शकले नाही. त्यामुळे अक्षयच्या OMG 2 सिनेमाकडे सर्वांचं लक्ष आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.