Akshay Kumar responds to question about joining politics: Google
मनोरंजन

अक्षय कुमार राजकारणात? म्हणाला,'समाजासाठी जे शक्य होईल ते करेन'

राजकीय नेतेमंडळींशी अक्षय कुमारचे असलेले सलोख्याचे संबंध त्यामुळे अनेकदा अभिनेत्याच्या राजकीय प्रवेशाविषयीची चर्चा रंगलेली दिसते.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत पहायला मिळतो. कधी आपल्या सिनेमांमुळे तर कधी कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे तो वादातही ओढला जातो. सध्या अक्षय कुमार चर्चेत आहे ते त्याच्या राजकीय प्रवेशामुळे. त्या यासंदर्भात प्रश्न विचारला गेला होता आणि त्यानं यावर आता उत्तर दिल्यानंअधिक चर्चा रंगली आहे. आपल्या राजकीय प्रवाशावर अक्षय कुमार म्हणाला आहे,'समाजासाठी जे माझ्यानं शक्य होईल तितकं करेन'. चला जाणून घेऊया लंडनच्या पॉल मॉलमध्ये 'इन्स्टिट्युट ऑफ डायरेक्टर्स' मध्ये आयोजित हिंदुजा आणि बॉलीवूड बूक लॉंचच्या निमित्तानं अक्षय कुमारने राजकारणात एन्ट्री करणार का या प्रश्नावर नेमकं काय उत्तर दिलं आहे.(Akshay Kumar responds to question about joining politics)

अक्षय कुमारला तो राजकारणात प्रवेश करणार का? हा प्रश्न विचारला गेला. यावर ५४ वर्षीय अभिनेता म्हणाला की,''मी सिनेक्षेत्रातच आनंदी आहे''. तो असं देखील म्हणाला की,''अभिनेता म्हणून तो आपल्या सिनेमातून सामाजिक विषय हाताळण्याचा पूर्ण प्रयत्न करतो''.

अक्षय कुमारने १९९१ मध्ये 'सौदागर' सिनेमातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. परंतु १९९२ साली आलेल्या 'खिलाडी' सिनेमानं त्याला सिनेमातलं पहिलं यश चाखायला मिळालं. त्यानंतर अक्षयने १०० हून अधिक सिनेमे केले आहेत. तो गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करतोय. त्याला राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. नुकताच त्याचा 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमा प्रदर्शित झाला. ३ जून,२०२२ रोजी सिनेमागृहात रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'नं मात्र काहीच दिवसांत बॉक्सऑफिसवर मान टाकली. या सिनेमात अक्षयसोबत मनुषी छिल्लर,संजय दत्त आणि सोनू सूद असे अनेक कलाकार होते.

जेव्हा अक्षयला राजकारणात एन्ट्री करणार का हा प्रश्न विचारला गेला,तेव्हा तो म्हणाला की,''मी सिनेमे करण्यातच खूश आहे. एक अभिनेता म्हणून माझ्या सिनेमांतून जेवढे सामाजिक विषय मी मांडू शकतो तेवढे मांडण्याचा माझा कायम प्रयत्न राहील. मी १५० सिनेमांतून काम केलंय,त्यातील 'रक्षाबंधन' सिनेमा माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे. मी व्यावसायिक सिनेमांची निर्मिती करतो,अनेकदा त्यातून सामाजिक मुद्दे प्रकर्षाने दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. रक्षाबंधन हा अक्षयचा सिनेमा आनंद एल रायनं दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा ११ ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे''.

अक्षय राजकारणात प्रवेश करणार ही बातमी काही पहिल्यांदाच चर्चेत आलेली नाही. याआधी देखील अनेकदा याची चर्चा झाली. २०१९ मध्ये आयोजित एका कार्यक्रमात अक्षयनं आपण राजकारणात प्रवेश करणार नाही असं स्पष्ट म्हटलं होतं. तो म्हणाला होता,''मला खूश रहायचं आहे. मी माझ्या सिनेमाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देईन. हेच माझं काम आहे''.

'रक्षाबंधन'नंतर अक्षयसकुमारचा 'सेल्फी' सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात इम्रान हाश्मि,नुसरत भरूचा,डायना पेंटी देखील दिसणार आहेत. अभिषेक शर्मा दिग्दर्शित 'रामसेतू' सिनेमातही अक्षय आहे,या सिनेमात त्याच्यासोबत जॅकलिन आणि नुसरत भरूचा देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

SCROLL FOR NEXT