Akshay Kumar shares news movie Bell Bottom poster on twitter 
मनोरंजन

अक्षय कुमारचा 'बेल बॉटम'मधला हा हटके लूक बघितला का?

वृत्तसंस्था

मुंबई : अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल्ल 4'ने नुकताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अक्षय नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करताना दिसतो. मग त्या देशभक्तीपर असो किंवा विनोदी. त्याने प्रत्येक भूमिकेला त्याने न्याय दिलेला आहे. त्याच्या पॅडमनॅ, मिशन मंगल या चित्रपटांनी एक नवा आदर्शच आपल्यासमोर ठेवला, तर हाऊसफुल्लमध्ये काम करून अक्षयने तो विनोदी कलाकार असल्याचे आपल्या चाहत्यांच्या पुन्हा लक्षात आणून दिले. हाऊसफुल्ल 4 चे यश साजरे करतानाच अक्षयने पुन्हा एकदा त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.  

काल (ता. 10) अक्षयने त्याच्या 'बेल बॉटम' या चित्रपटाची घोषणा केली. त्याचबरोबर या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील शेअर केले आहे. यात तो 80च्या दशकातल्या रेट्रो लूकमध्ये तो दिसतोय. या पोस्टरला कॅप्शन देताना अक्षयने लिहिले आहे की, '80च्या दशकात जाण्यासाठी अन् रोलर कोस्टर राईडसाठी तयार राहा.' हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 22 जानेवारी 2021मध्ये प्रदर्शित होईल.  

अक्षयने हे पोस्टर रिलीज केल्या केल्या हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. अक्षय एका वेगळ्या आणि हटके लूकमध्ये दिसत असल्याने चाहत्यांच्या उत्सुकता वाढली आहे. अक्षयने सांगितले की हा चित्रपट एका नव्या कहाणीवर आधारीत आहे. वाशु भागनानी या चित्रपटाचे निर्माते असतील. 

येत्या वर्षात अक्षय कुमारचे मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये सूर्यवंशी, गुड न्यूज, लक्ष्मी बॉम्ब, पृथ्वीराज, बच्चन पांड्ये या चित्रपटांचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT