अक्षय कुमार(Akshay Kumar) हा बॉलीवूडमधला सर्वात यशस्वी अभिनेता आहे. खान मंडळींना तगडी टक्कर देत बाजी मारणारा अभिनेता म्हणूनही या खिलाडी कुमारकडे पाहिलं जातं. त्यानं आतापर्यंत अनेक हीट सिनेमे बॉलीवूडला दिले आहेत. १८ मार्चला त्याचा बहुचर्चित 'बच्चन पांडे' सिनेमा आपल्या भेटीस येत आहे. पुढे डझनभर सिनेमे रांगेत शूटिंगसाठी अन् त्यानंतर प्रदर्शनासाठी नंबर लावून असतील. अनेक वर्ष सिनेइंडस्ट्रीत काम केल्यानंतर त्यानं स्वतःपुरते काही नियम घालून घेतलेयत. त्याच्या म्हणण्यानुसार सिनेमाचं बजेट जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर कमीत कमी दिवसांत सिनेमाचं शूटिंग पूर्ण करणं गरजेचं आहे. तो ज्या सिनेमात काम करणार असेल त्या प्रत्येक सिनेमाचं शूटिंग जर वेळेत संपणार असेल तरच तो त्यात काम करण्यास तयार होतो.
अक्षय कुमारचा ऐतिहासिक 'पृथ्वीराज' सिनेमा ही प्रदर्शनाच्या तयारीत आहे. 'रक्षाबंधन','राम सेतू','OMG2-ओ माय गॉड!2' हे त्याचे सिनेमे वर्षभरात प्रदर्शित होतायत. त्यानं काही दिवसांपूर्वीच 'राम सेतू' सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. सध्या मात्र तो बिझी आहे 'बच्चन पांडे' सिनेमाचं प्रमोशन करण्यात. सिनेमाच्या बजेटविषयी बोलताना अक्षय म्हणाला, ''बजेट ही अशी गोष्ट आहे जी कोणताही सिनेमा बनताना पहिल्यांदा विचारात घेतली जाते. आणि मी असा माणूस आहे ज्याचा 'बजेट हीट,तो सिनेमा हीट' या उक्तीवर विश्वास आहे. मला कुणाचेच पैसे वाया गेलेले आवडत नाही आणि मी प्रत्येकाच्या वेळेचा आदर करतो. मी माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकाराचा आणि क्रु-मेंबर्सच्या वेळेचा आदर करतो ज्याबदल्यात ते माझ्या वेळेचा देखील विचार करतात''.
अक्षय पुढे म्हणाला,''कोणातही सिनेमा हा ४५ ते ५० दिवसांत जर पूर्ण केला तर बजेट कंट्रोलमध्ये राहते. मी ज्या सिनेमाला १०० दिवस लागणार असतील अशा सिनेमात काम करत नाही. माझ्यासाठी सेटवर आलं की आपलं काम करा आणि घरी निघून जा ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. उगाच नको तो अॅटिट्युड मी सेटवर दाखवून वेळ वाया घालवत बसत नाही. अक्षयचा 'अतरंगी रे' सिनेमा २०२१ साली आपल्या भेटीस आला होता. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अली खान,धनुष हे देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत होते. हा सिनेमा ख्रिसमसमध्ये डिस्ने हॉट स्टारवर प्रदर्शित करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.